शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा अध्यक्षांवर दबाव आणला!

By admin | Updated: August 15, 2015 01:44 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांची मागणी सलग चार आठवड्यांपर्यंत फेटाळून लावणाऱ्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केवळ सरकारकडून आलेल्या

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांची मागणी सलग चार आठवड्यांपर्यंत फेटाळून लावणाऱ्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केवळ सरकारकडून आलेल्या ‘दबावा’मुळेच स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून ललित मोदी वादावर चर्चा करण्याची परवानगी दिली, असा दावा काँग्रेसने केला आहे.ललित मोदी वाद आणि व्यापमं घोटाळ्यावरून संसदेचे कामकाज सतत ठप्प पाडणाऱ्या विरोधकांना लक्ष्य बनविण्याच्या उद्देशाने अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात सरकार स्थगन प्रस्तावाअंतर्गत चर्चेसाठी राजी झाले, असा आरोप लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे संयुक्त पत्रपरिषदेत केला. संसदेचे पावसाळी अधिवेशन वाया जाण्यासाठी एकटा भाजप आणि रालोआ सरकारच जबाबदार असल्याचे सांगून खरगे म्हणाले, सरकारने दबाव आणल्यानंतरच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी चर्चेला अनुमती दर्शविली. त्याआधी चर्चेची परवानगी लेखी स्वरूपात नाकारणाऱ्या महाजन यांनी अचानक चर्चेला होकार दिल्याबद्दल आश्चर्य वाटते. त्या सरकारच्या दबावात होत्या, असे यावरून दिसते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी विनंती केल्यानंतर आणि संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी त्याचे अनुमोदन केल्यानंतर महाजन यांनी स्थगन प्रस्तावाअंतर्गत ललित मोदी वादावर चर्चा करण्याची परवानगी दिली होती, हे येथे उल्लेखनीय आहे. खरगे म्हणाले, पावसाळी अधिवेशनाच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच लोकसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून ललित मोदी वादावर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्ष करीत होता; परंतु लोकसभा अध्यक्ष रोज आमची ही मागणी फेटाळून लावत होत्या; पण अचानक अधिवेशन समाप्तीस आले असताना त्यांनी सरकारच्या दबावामुळे स्थगन प्रस्ताव स्वीकारून चर्चेला परवानगी दिली.आता सरकार विरोधकांना लक्ष्य बनवीत असले तरी काँग्रेसच्या सहकार्याने अनेक विधेयके पारित झालेल्या आधीच्या अधिवेशनातील १२८ टक्के कामकाज सुरळीतपणे चालल्याचे श्रेय आम्हाला देऊ इच्छित नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)