शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींचा ताफा थांबवून त्याने रुग्णवाहिकेला दिले प्राधान्य!

By admin | Updated: June 21, 2017 01:41 IST

भरगच्च वाहतुकीच्या एका चौकात वाहतुकीचे नियंत्रण करताना राष्ट्रपतींच्या ताफ्याला थांबवून रुग्णवाहिकेस अग्रक्रम दिल्याबद्दल बंगळुरू वाहतूक पोलिसांतील एक उपनिरीक्षक

बंगळुरू : भरगच्च वाहतुकीच्या एका चौकात वाहतुकीचे नियंत्रण करताना राष्ट्रपतींच्या ताफ्याला थांबवून रुग्णवाहिकेस अग्रक्रम दिल्याबद्दल बंगळुरू वाहतूक पोलिसांतील एक उपनिरीक्षक एम. एल. निजलिंगप्पा यांचे सर्वदूर कौतुक होत आहे.बंगळुरू मेट्रो ग्रीन लाइनचे उद््घाटन करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शनिवारी शहरात आले होते. त्यांच्या मोटारींचा ताफा राजभवनाकडे जाणार म्हणून शहरातील रस्त्यांवरील वाहतूक रोखण्यात आली होती. उपनिरीक्षक निजलिंगप्पा ट्रिनिटी चौकात ड्युटीवर होते. अडवलेल्या वाहनांमध्ये एक रुग्णवाहिकाही अडकल्याचे त्यांना दिसली. राष्ट्रपतींचा ताफा जाण्याची वाट न पाहता त्यांनी लगेच सहकाऱ्यांना पाठविले व रुग्णवाहिकेस वाट करून दिली. थांबविलेल्या वाहतुकीपैकी एका वाहनातील नागरिकाने ही घटना कॅमेऱ्यात टिपली व ती छायाचित्रे समाजमाध्यमांत टाकली. त्यानंतर निजलिंगप्पांवर कौतुकाचा वर्षाव झाला. रविवारी त्यांचा खात्यातर्फे सत्कारही करण्यात आला. (वृत्तसंस्था)वरिष्ठांनीही निजलिंगप्पा यांच्या माणुसकीची व प्रसंगावधानाची प्रशंसा केली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अभय गोयल यांनी निजलिंगप्पा यांना बक्षिशी देण्यात येत असल्याचे टिष्ट्वटरवर म्हटले व नागरिकांनीही त्यांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले. अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल सूद यांनीही ‘वेल डन’असे टिष्ट्वट करून या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बक्षिसासाठी शिफारस केली.