शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतीही चुकू शकतात; उत्तराखंड हायकोर्टाचे मत

By admin | Updated: April 21, 2016 04:25 IST

राष्ट्रपतीही चुकू शकतात त्यामुळे उत्तराखंड विधानसभा निलंबित ठेवण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाच्या वैधतेबाबत न्यायालयीन समीक्षा केली जाऊ शकते, असे उत्तराखंड उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्टकेले.

नैनीताल : राष्ट्रपतीही चुकू शकतात त्यामुळे उत्तराखंड विधानसभा निलंबित ठेवण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाच्या वैधतेबाबत न्यायालयीन समीक्षा केली जाऊ शकते, असे उत्तराखंड उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्टकेले.उत्तराखंडमध्ये कलम ३५६ अन्वये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय राजकीय शहाणपणातून घेतल्याचा युक्तिवाद मोदींच्या सरकारने केला. त्यावर लोक चूक करू शकतात. मग ते राष्ट्रपती असोत किंवा न्यायाधीश. राष्ट्रपतींनी त्यांच्यासमोर सादर केलेल्या तथ्यांच्या आधारे कायदेशीर हस्तक्षेप केला असला तरी त्यांचा निर्णय न्यायालयीन समीक्षेसाठी खुला आहे, असे मुख्य न्यायाधीश के.एम. जोसेफ आणि व्ही.के. बिस्त यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. त्यावर राष्ट्रपतींच्या समक्ष ठेवण्यात आलेली तथ्ये पाहता त्यांचा निर्णय न्यायालयापेक्षा भिन्न असू शकतो, असा दावा केंद्राने केला. उत्तराखंडच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे या राज्यातील परिस्थितीबाबत पाठविलेला अहवाल पाहता २८ मार्च रोजी विधानसभेत शक्तिपरीक्षणाकडे वाटचाल चाललेली होती, हे स्पष्ट होते असे खंडपीठाने म्हटल्यानंतर केंद्राने उपरोक्त युक्तिवाद केला.३५ आमदारांनी तसेच काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनी मतविभाजनाची मागणी केल्याचा उल्लेख राज्यपालांनी १९ मार्च रोजी राष्ट्रपतींकडे पाठविलेल्या अहवालात केलेला नाही. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज व्यक्त करणारी कोणतीही भीती राष्ट्रपतींच्या मनात नव्हती. त्याबाबत कोणतीही तथ्ये त्यांच्यासमक्ष नव्हती. असे असताना ३५ आमदार विरोधात उभे ठाकले ही बाब किंवा राज्यपालांनी तसा सुपूर्द केलेला अहवाल केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयाप्रत येण्यासाठी समाधानकारक कसा मानला? असा सवालही न्यायालयाने केला. (वृत्तसंस्था)बंडखोर आमदारांबाबतची चिंता विसंगत...राष्ट्रपती राजवटीला आव्हान देणाऱ्या पदच्युत मुख्यमंत्री हरीश रावत आणि इतरांच्या याचिकेवर खंडपीठाने सुनावणी केली. रावत यांनी नऊ बंडखोर आमदारांवर केलेले आरोप हे कलम ३५६ लागू करण्यासाठी पुरावा मानण्याबाबतही खंडपीठाने आक्षेप घेतला. या आमदारांबाबत केंद्र सरकारने व्यक्त केलेली चिंता पूर्णपणे विसंगत आणि अस्वीकारार्ह आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल एवढी गोपनीयता का? त्यावर न्यायालयात चर्चा का केली नाही. त्याबाबत याचिकाकर्ते रावत यांना टिपण का दिले नाही, अशी विचारणाही खंडपीठाने केली.