शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंच्या बडतर्फीस राष्ट्रपतींकडून मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 03:19 IST

विश्व भारतीचे कुलगुरू सुशांत दत्तगुप्ता यांना बडतर्फ करण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी मंजुरी दिली.

नवी दिल्ली : विश्व भारतीचे कुलगुरू सुशांत दत्तगुप्ता यांना बडतर्फ करण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी मंजुरी दिली. एखाद्या केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूला पदावरून हटविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.‘विश्व भारतीचे कुलगरू दत्तगुप्ता यांना पदावरून हटविण्याचा प्रस्ताव मंत्रालयाने दिला होता. त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे,’ असे मंत्रालयाचे प्रवक्ते घनश्याम गोयल म्हणाले. दत्तगुप्ता यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस करणारी फाईल मंत्रालयाने या महिन्याच्या प्रारंभी राष्ट्रपतींकडे पाठविली होती. दत्तगुप्ता यांच्याविरुद्ध वित्तीय आणि प्रशासकीय गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)तत्पूर्वी राष्ट्रपतींनी कुलगुरूंना हटविण्याच्या शिफारशीवर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर मंत्रालयाने कायदा मंत्रालयाचे मत मागितले होते. याआधी राष्ट्रपतींनी दत्तगुप्तांच्या बडतर्फीची शिफारस करणारी फाईल दोनदा परत केली होती. परंतु कायदा मंत्रालयाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठिंबा दिल्यानंतर ही फाईल पुन्हा राष्ट्रपतींना सादर करण्यात आली आणि सोमवारी राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केले.