नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बुधवारी आपला व्हिएतनाम दौरा पूर्ण करून मायदेशी परतले. हा दौरा अत्यंत यशस्वी व उभय देशांच्या संबंधांना चालना देणारा ठरल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. राष्ट्रपतींच्या चारदिवसीय दौ:यात उभय देशांत अनेक महत्त्वूपर्ण करार झाले. याशिवाय दक्षिण चीन समुद्र आणि आसपासच्या सागरी भागात मुक्त वाहतुकीसाठी भारत-व्हिएतनाम पुढाकाराची घोषणा करण्यात
आली.
आपल्या राजकीय दौ:याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रपतींनी
प्रसिद्ध कु ची बोगदे पाहिले. हे
बोगदे व्हिएतनामच्या स्वातंत्र्यलढय़ाचे जिवंत ऐतिहासिक प्रतीक आहेत.
व्हिएतनाम दौ:यादरम्यान मुखर्जी यांनी राष्ट्रपती त्रुओंग तान सांग, पंतप्रधान न्गुयेन तान दुंग, कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस न्गुयेन फू त्रोंग आणि हो ची मिन सीटीतील पक्ष समितीचे सचिव ली थान यांच्यासह अनेक नेत्यांशी चर्चा केली. उभय देशांनी संरक्षण खरेदी, तेल उत्खनन आणि हवाई संपर्क यासारख्या महत्त्वपूर्ण व व्यूहात्मकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)