शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती मुखर्र्जींकडून पुन्हा सहिष्णुतेचे आवाहन

By admin | Updated: November 22, 2015 03:00 IST

संपूर्ण जग सध्या असहिष्णुतेमुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीचा सामना करीत असून, भारताची बहुविविधता टिकवून ठेवणाऱ्या मूल्यांना बळ देण्यासोबतच जगभरात त्याचा

नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या असहिष्णुतेमुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीचा सामना करीत असून, भारताची बहुविविधता टिकवून ठेवणाऱ्या मूल्यांना बळ देण्यासोबतच जगभरात त्याचा प्रचार-प्रसार करण्याची ही वेळ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी केले.भारततज्ज्ञांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जगाला अजूनही भारताकडून केवळ सहिष्णुताच नाही तर सहानुभूतीच्या विचारांची शिकवण घ्यायची आहे, या स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या संदेशाचे स्मरण करून देताना भारत ज्या विचारांसाठी ओळखला जातो त्याचा पुनरुच्चार मुखर्जी यांनी केला. ते म्हणाले की, आज साऱ्या जगात असहिष्णुता आणि द्वेषाचे वातावरण पसरले असून, न भूतो न् भविष्यती अशी अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या असहिष्णुतेशी आपल्याला संघर्ष करावा लागतो आहे.यावेळी भारताचा आत्मा असलेले उच्च मूल्य, लिखित व अलिखित संस्कार, कर्तव्य आणि जीवनशैलीच आपल्याला या संकटातून मार्ग दाखवू शकते, असेही मुखर्जी यांनी अधोरेखित केले. गोमांस सेवनाच्या अफवेवरून दादरीत घडलेले हत्याकांड आणि त्यानंतरच्या घटनांपासूनच मुखर्जी सहिष्णुता बाळगण्याचे आवाहन करीत आहेत. (वृत्तसंस्था)