शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

तयारी जय्यत, प्रतीक्षा पाहुण्यांची

By admin | Updated: January 23, 2015 01:44 IST

भारतात दाखल होणाऱ्या बराक ओबामा यांच्या या दौऱ्याच्या सुरक्षिततेसाठी अमेरिका कोट्यवधी डॉलर्सचा खर्च करत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून २५ जानेवारीला तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल होणाऱ्या बराक ओबामा यांच्या या दौऱ्याच्या सुरक्षिततेसाठी अमेरिका कोट्यवधी डॉलर्सचा खर्च करत आहे. ओबामा यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. जगातील सर्वात जुन्या लोकशाहीचा अध्यक्ष सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ््यास लावत असलेली हजेरी हा विलक्षण कुतुहलाचा विषय बनला आहे. भारत ‘अतिथी देवो भव’ म्हणत यजमानाची भूमिका निभावण्यास सज्ज आहे. अनेक अर्थ आणि तितकेच पैलू लाभलेल्या या दौऱ्याचा हा विविधांगी धांडोळा. विमानातील व्हाईट हाउस आणि अत्याधुनिक कार ओबामांचा ताफा, त्यांचा तामझाम हे सारे जनसामान्यांसाठी अद््भुत आहे. त्यांचे एअरफोर्स वन हे विमान, अभेद्य कवच लाभलेली काळ््या रंगाची बीट््स कार...त्यातील व्यवस्था, त्यातील तंत्रज्ञान सारे काही महासत्तेला शोभेसे आहे. हा सगळा थाट भारतवासीय तीन दिवस अनुभवणार आहेत...कॅडिलॅकलांबी - ५ मीटरवजन - ७.५ टनकिंमत - ३००००० अमेरिकन डॉलरमाइलेज - ५ किमी प्रती गॅलनचालक गुप्तचर विभागातील अत्यंत निष्णांत व्यक्ती कशाही प्रकारे, अगदी १८० डिग्री कोनातूनही गाडी वळवू शकेल इतका तरबेज.बॉडी : लष्करी अवजड वाहनांसाठी वापरण्यात येणारे १२ सें.मी. जाडीचे दुप्पट मजबुतीकरण केलेले पोलाद, अ‍ॅल्युमिनिअम, टॅटिनिअम आणि सिरॅमिकचा वापर इंधनाची टाकीचिलखती, अग्निरोधक, थेट त्यावर मारा झाल्यावरही कोणतीही होणार नाही अशी मजबूतपुढील बम्पर रात्रीच्या अंधारातही सुस्पष्ट चित्रीकरण करणारा कॅमेरा अश्रूधुराच्या नळकांड्याटायर : गुडइयर कंपनीचे अतिशय उच्च प्रतीचे आणि पंक्चर प्रतिंबधक टायर नसतानाही व्यवस्थित धावू शकतील असे स्टीलचे चाक.दरवाजे : बायोकेमिकल हल्ल्यांचा परिणाम न होणारे, अत्याधुनिक स्फोटकांच्या स्फोटांतही मजबूत राहणारे, काचा विविध थर असलेल्या आणि बोइंग ७५७ विमानात वापरण्यात येणाऱ्या १२ सें.मी. जाडअंतर्गत रचना : स्वदेशी बनावटीचा सॅटेलाइट फोन, ज्याद्वारे उपराष्ट्राध्यक्ष आणि पेन्टागॉनशी थेट संपर्क, रेमिंग्टन शॉटगनट्रंक : आॅक्सिज टँक, अग्निरोधक उपकरणे, ओबामांच्या रक्तगटाशी जुळणाऱ्या रक्ताची ब्लड बँकअमेरिकेचा कोट्यवधी डॉलरचा खर्चभारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून २५ जानेवारी रोजी तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यावर ओबामा यांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिका कोट्यवधी डॉलर्सचा खर्च करत आहे. रविवार दिनांक २५ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता ओबामा यांचे नवी दिल्लीत आगमन होईल. ओबामा यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. २०१० मध्ये ओबामा भारतात आले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने १ हजार कोटी रुपये (२०० दशलक्ष डॉलर) खर्च केले होते; पण यावेळच्या भारत भेटीत ओबामा यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेकडून कोट्यवधी डॉलर्स खर्च केले जात आहेत. ओबामा यांच्या सुरक्षेसाठी असलेला डॉग स्क्वॉड भारतात पोहोचला आहे. त्याला इलाईट के -९ असे म्हटले जाते. किचनसह एकावेळी २००० लोक जेऊ शकतील एवढी डायनिंग रूमभोपाळ गॅस गळतीवर बोलण्याचा आग्रहदावोस : मानवाधिकार संघटना अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे आगामी दौऱ्यात भोपाळ गॅस गळतीचा मुद्दा उपस्थिती करण्याचा आग्रह केला आहे. संघटनेचे महासचिव सलिल शेट्टी म्हणाले, लोक अनेक दशकांपासून न्याय आणि आपल्या अधिकारांची वाट पाहत आहेत. त्या संकटाचे परिणाम आजही दिसून येतात.