शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा बरखास्त करण्याचा ड्राफ्ट तयार

By admin | Updated: October 26, 2016 06:13 IST

समाजवादी पार्टी आणि यादव घराण्यातील समेटाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा ड्राफ्ट तयार केला

- मीना कमल, लखनौ समाजवादी पार्टी आणि यादव घराण्यातील समेटाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा ड्राफ्ट तयार केला आहे, असे सांगण्यात येते. मुलायमसिंग यादव आणि शिवपाल यादव यांनी आपणास हटवण्याचा प्रयत्न केल्यास अखिलेश विधानसभा बरखास्तीची शिफारस करतील, असे दिसते.ड्राफ्टच्या कायदेशीर तपशिलाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांशी तसेच विधी विभागातील जाणकारांशी विचारविनिमय केल्याचेही समजते. अखिलेशच मुख्यमंत्री राहतील आणि हकालपट्टी झालेल्या मंत्र्यांना परत घेण्याबाबत तेच निर्णय घेतील, असे मुलायमसिंग म्हणाले आहेत. सपातील यादवी संपवण्याचा प्रयत्न करताना मुलायमसिंग यांनी विरोधकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर अखिलेश यांनी नवे हत्यार उपसत विधानसभा बरखास्त करण्याची तयारी सुरू केली. गरज पडल्यास याही अस्त्राचा वापर केला जाऊ शकतो. हकालपट्टी केलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेण्यास अखिलेश यांचा विरोध आहे. पण तसा दबाव आल्यास अखिलेश हे विधानसभा बरखास्तीची शिफारस करू शकतात. यामुळे मंत्रिमंडळही राहणार नाही आणि मंत्र्यांना पुन्हा सामील करून घेण्याचा दबावही राहणार नाही, असे त्यांना वाटते. सोमवारी रात्री अखिलेश यांनीअचानक पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. त्याचबरोबर आपल्या मर्जीतले अधिकारी व विधी विभागातील अधिकाऱ्यांशीही त्यांनी विचारविनिमय केला. योग्य वेळेची वाट पाहण्याचीही तयारीअखिलेश यांनी विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली, तर चेंडू राज्यपालांच्या कोर्टात जाईल व त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली, तर सारेच मुसळ केरात जाईल, अशीही त्यांना भीती वाटते आहे. या सर्व शक्याशक्यतांच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी मर्जीतील लोकांशी विधानसभा बरखास्त करण्याच्या शिफारशीच्या ड्राफ्टबाबत चर्चा केली. तथापि, बरखास्तीचे पत्र राज्यपालांकडे कधी सुपुर्द करायचे, यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्याचीही तयारी आहे.