पूर्ववैमनस्यातून मारहाण
By admin | Updated: March 23, 2016 00:11 IST
जळगाव: तालुक्यातील विटनेर शिवारात भगवान हिरालाल राजपूत (रा.पळासखेडा, ता.जामनेर) यांना गुलाब शंकर राजपूत व विजय एकनाथ न्हावी यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्यांना जबर दुखापत झाली आहे. राजपूत व न्हावी यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्ववैमनस्यातून मारहाण
जळगाव: तालुक्यातील विटनेर शिवारात भगवान हिरालाल राजपूत (रा.पळासखेडा, ता.जामनेर) यांना गुलाब शंकर राजपूत व विजय एकनाथ न्हावी यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्यांना जबर दुखापत झाली आहे. राजपूत व न्हावी यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघातप्रकरणी गुन्हा दाखलजळगाव: महामार्गावर प्रभात चौकात १८ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता झालेल्या ट्रक व दुचाकीच्या अपघातप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडूरंग गंभीर सोनवणे (वय ६० रा.मेहरुण) त्यांच्या दुचाकीने (एम.एच.१९ ए.जे.९०९३) जात असताना मागून आलेल्या ट्रकने (एम.एच.०५ ए.एम.०९७४) त्यांना धडक दिली होती. यात सोनवणे यांना मुका मार लागला होता तर दुचाकीचे नुकसान झाले होते.