शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जेट एअरवेजच्या विमानास पक्षी धडकला

By admin | Updated: December 30, 2014 02:09 IST

मुंबईहून येत असलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यानंतर त्याच्या डाव्या इंजिनाला आग लागली. त्यामुळे हे विमान आपत्कालीन स्थितीत उतरले. विमानात १२५ प्रवासी आणि सहा कर्मचारी होते.

काठमांडू : मुंबईहून येत असलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यानंतर त्याच्या डाव्या इंजिनाला आग लागली. त्यामुळे हे विमान आपत्कालीन स्थितीत उतरले. विमानात १२५ प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. विमान काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप उतरले, असे ‘जेट एअरवेज’ने सांगितले. हे विमान उतरण्याच्या तयारीत असतानाच त्याला पक्ष्याची धडक बसली. यानंतर त्याच्या एका इंजिनला किरकोळ आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानतळाचे व्यवस्थापक बीरेंद्र श्रेष्ठ यांनी सांगितले की, उतरण्यापूर्वी विमानाला (फ्लाईट क्रमांक ९ डब्ल्यू २६८) ललितपूरच्या इमादोल भागात पक्षी धडकला. हा पक्षी विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये घुसला. त्यामुळे इंजिनाला आग लागली. विमान काठमांडूतील विमानतळावर उतरल्यानंतर त्याला लगेचच आग लागली. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. जेट एअरवेजच्या अभियंत्यांचे पथक विमानाची तपासणी करत आहे. त्यांनी विमानाच्या उड्डाणास धोका नसल्याचे प्रमाणित केल्यानंतर त्याला परत जाण्याची मुभा दिली जाईल, असे श्रेष्ठ यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)