शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयकडून प्रणय रॉय यांच्या घराची झाडाझडती

By admin | Updated: June 6, 2017 04:44 IST

खासगी बँकेचे नुकसान केल्याप्रकरणी एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय यांच्या घरासह चार ठिकाणी सीबीआयने सोमवारी धाडी टाकल्या

शीलेश शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : समभागांची देवाणघेवाण सेबीपासून लपविणे व खासगी बँकेचे नुकसान केल्याप्रकरणी एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय यांच्या घरासह चार ठिकाणी सीबीआयने सोमवारी धाडी टाकल्या. ही झडती खोट्या आरोपांवरून सूडभावनेने केलेली कारवाई असल्याचे चॅनेलने म्हटले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आपनेही ही कारवाई सूडभावनेने झाल्याची टीका केली आहे.सीबीआयने आरआरपीआर होल्डिंग्ज प्रा. लि., प्रणय रॉय, त्यांच्या पत्नी राधिका आणि आयसीआयसीआयच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. आरआरपीआर होल्डिंग्जने जनतेकडून एनडीटीव्हीचे २० टक्के समभाग खरेदी करण्यासाठी इंडिया बुल्स प्रा. लि.कडून कथितरीत्या ५०० कोटींचे कर्ज घेतले होते. आरआरपीआर होल्डिंग्जने इंडिया बुल्सची उधारी चुकती करण्यासाठी १९ टक्के प्रतिवर्ष दराने आयसीआयसीआय बँकेकडून ३७५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. एनडीटीव्हीच्या प्रमोटरांनी आपले सर्व समभाग गहाण ठेवून हे कर्ज घेतले होते, असा सीबीआयचा आरोप आहे. समभाग गहाण ठेवण्यात आल्याची बाब सेबी, स्टॉक एक्स्चेंज तसेच माहिती व प्रसारण मंत्रालयापासून लपवून ठेवण्यात आली. या व्यवहारात कथितरीत्या ६१ टक्क्यांहून अधिक मताधिकार भांडवलाची निर्मिती केली गेली. वास्तविक बँकिंग नियमन कायदा कलम १९(२) अनुसार हे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक असता कामा नये. कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळेच याबाबतची माहिती दडवून ठेवण्यात आली, असा सीबीआयचा आरोप आहे. आयसीआयसीआयने व्याजात १० टक्क्यांची सूटही दिली. या व्यवहारात आयसीआयसीआय बँकेला ४८ कोटी रुपयांचा तोटा, तर आरआरपीआरला फायदा झाला असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.ममतांना धक्काया धाडीमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. रॉय हे आदरणीय व्यक्ती असून, अशी कारवाई चुकीची आहे, असे त्या म्हणाल्या. रॉय यांच्यावरील सीबीआय धाडीचा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी निषेध केला आहे.लढा देत राहूसीबीआयने आज सकाळी जुन्या खोट्या आरोपांच्या आधारे एनडीटीव्ही आणि प्रमोटरांचा संघटित छळ आणखी वाढवला. एनडीटीव्ही आणि त्याचे प्रमोटर विविध एजन्सींकडून सुरू असलेल्या या सुडाच्या कारवाईविरुद्ध सातत्याने लढा देतील, असे एनडीटीव्हीने एका निवेदनात म्हटले. भारतातील लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमकुवत करण्याच्या या प्रयत्नांसमोर आम्ही गुडघे टेकणार नाही. भारताची प्रतिष्ठाने आणि भारत ज्या गोष्टींसाठी उभा आहे त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही संदेश देऊ इच्छितो की, आम्ही देशासाठी लढू आणि यावर विजय मिळवू.हस्तक्षेप नाही - नायडूया धाडीत सरकारी हस्तक्षेप नसून कायदा त्याचे काम करीत आहे, कोणी केवळ प्रसिद्धीमाध्यमाशी संबंधित असल्यामुळे चुकीचे काम करीत असेल तर सरकार गप्प बसेल, अशी अपेक्षा तुम्हाला करता येणार नाही, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.सत्तेचा दुरुपयोग ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांना केंद्रावर टीका केली आहे. सत्तेचा दुरुपयोग सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. माध्यमे आणि इतर असंतुष्ट आवाजांना दडपण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. आमचे ऐका अन्यथा तुमचाही रॉय होईल, असा संदेश माध्यमांना देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.