शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणामध्ये येणार नाहीत; शर्मिष्ठा यांचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 05:10 IST

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणामध्ये येणार नाहीत, असे त्यांची कन्या व काँग्रेसनेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली  - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणामध्ये येणार नाहीत, असे त्यांची कन्या व काँग्रेसनेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.२०१९च्या आगामी लोकसभा निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी रा. स्व. संघ पुढे करण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावर शर्मिष्ठा यांनी शिवसेनेला हे प्रत्युत्तर दिले आहे.रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी नागपूर येथे गेल्या आठवड्यात संघ मुख्यालयात झालेल्या समारंभात प्रणव मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. तिथे त्यांनी दिलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात उदंड चर्चा झाली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते की, आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपाला बहुमतासाठी आवश्यक जागा जिंकता आल्या नाहीत, तर पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी यांचे नाव पुढे करण्याचा संघाचा इरादा आहे.त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शर्मिष्ठा मुखर्जी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, माझे वडील प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणात येण्याची अजिबात शक्यता नाही. मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार, असे जाहीर झाल्यानंतर शर्मिष्ठा यांनी टिष्ट्वट करून जाहीर नापसंती व्यक्त केली होती. या उपस्थितीमुळे भाजपा व संघाला अफवा पसरविण्यास आयती संधी मिळेल, असा सावधगिरीचा इशाराही शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांना दिला होता.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीPoliticsराजकारण