शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार लवकरच नियमावली आणणार: प्रकाश जावडेकर

By देवेश फडके | Published: January 31, 2021 5:56 PM

आता ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार लवकरच नियमावली आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

ठळक मुद्देओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नियमावली आणणारकेंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहितीओटीटी प्लॅटफॉर्मविरोधातील वाढत्या तक्रारींनंतर निर्णय

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे काही महिने दैनंदिन व्यवहारही पूर्णपणे ठप्प झाले असताना कोट्यवधी युझर्सनी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मनोरंजनाची भरपूर मजा लुटली. मात्र, हळूहळू ओटीटी प्लॅटफॉर्मविरोधात तक्रारींची संख्या वाढत गेली. या पार्श्वभूमीवर आता ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार लवकरच नियमावली आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

ओटीटी प्लॅटफॉर्मविरोधात तक्रारींवर अनेकदा चर्चा, वाद झाले. मिर्झापूर, तांडव यांसारख्या अनेक वेब सीरिजला झालेल्या विरोधानंतर आता केंद्र सरकारने गंभीर आणि कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित आणल्यानंतर केंद्र सरकार त्यांच्या कामाच्या प्रणालीबद्दल लवकरच नियमावली जारी करणार आहे. 

काय म्हणाले प्रकाश जावडेकर?

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही मालिकाबद्दल आमच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेब सीरिज व डिजिटल न्यूजपेपर्स प्रेस कॉन्सिल कायदा, केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा वा सेन्सॉर बोर्डाच्या कक्षेत येत नाहीत. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कामासंदर्भात लवकरच नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.

चित्रपट रसिकांसाठी गुड न्यूज, १ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहे 'हाऊसफुल्ल'

ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारचे नियंत्रण

प्रसारमाध्यमांवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण नाही. प्रसारमाध्यमांवरील नियमनासाठी स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच ऑनलाइन माध्यमांसाठीही स्वायत्त संस्थांचे नियंत्रण असू शकेल. केंद्र सरकार नियमनाबाबत हस्तक्षेप करणार नसल्याची भूमिका केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने यापूर्वी घेतली होती. मात्र, गेल्या वर्षी अधिसूचना रद्द करून ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने थेट नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला होता.  ०१ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहे 'हाऊसफुल्ल'

आता ०१ फेब्रुवारीपासून १०० टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात एसओपी जाहीर केली असून, १०० टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. चित्रपटगृहांच्या आत आणि कॉमन एरियामध्ये प्रेक्षकांना ६ फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. तसेच चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि प्रेक्षक बाहेर पडणाऱ्या ठिकाणी सॅनिटायझर असणंदेखील बंधनकारक करण्यात आले आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारPrakash Javadekarप्रकाश जावडेकरNetflixनेटफ्लिक्सamazonअ‍ॅमेझॉन