शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी मनपातील यंत्रणा दोन तास ठप्प लिफ्ट बंद: आयुक्त, उपायुक्त चौथ्या मजल्यावर

By admin | Updated: April 19, 2016 00:48 IST

जळगाव : महापालिकेच्या १७ मजली इमातीत सकाळी ११ वाजेच्या दरम्यान वीज पुरवठा यंत्रणा बंद पडल्याने सर्व लिफ्ट जागच्या जागी थांबून काही जण त्यात अडकले होते. काही वेळात त्यांची कशीबशी सुटका झाली मात्र दुपारी १.१५ पर्यंत ही यंत्रणा बंदच होती. कर्मचारी व नागरिक येण्याच्या वेळेतच वीज पुरवठा बंद झाल्याने अनेकांना कसरत करत वरच्या मजल्यांवर जावे लागले. तर आयुक्त व उपायुक्तांनी चौथ्या मजल्यावरच बसून कामकाज केले.

जळगाव : महापालिकेच्या १७ मजली इमातीत सकाळी ११ वाजेच्या दरम्यान वीज पुरवठा यंत्रणा बंद पडल्याने सर्व लिफ्ट जागच्या जागी थांबून काही जण त्यात अडकले होते. काही वेळात त्यांची कशीबशी सुटका झाली मात्र दुपारी १.१५ पर्यंत ही यंत्रणा बंदच होती. कर्मचारी व नागरिक येण्याच्या वेळेतच वीज पुरवठा बंद झाल्याने अनेकांना कसरत करत वरच्या मजल्यांवर जावे लागले. तर आयुक्त व उपायुक्तांनी चौथ्या मजल्यावरच बसून कामकाज केले.
महापालिकेतील लिफ्ट अचानक बंद पडण्याचे प्रकार वारंवार होत असतात. सहा पैकी जेमतेम चार लिफ्ट सुरू असतात. बर्‍याच वेळेस कर्मचारी नसल्यानेही लिफ्ट बंद असतात. सोमवार आठवड्याचा पहिला दिवस. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी ११ वाजेच्या दरम्यान कार्यालयात आले तर विजेअभावी ही यंत्रणा बंद पडली होती.
अचानक झाला आवाज
१७ मजलीतील वीज यंत्रणेत अचानक बिघाड होऊन मोठा आवाज झाला व वीज पुरवठा बंद झाला होता. त्यातच मोठे जनरेटरही सुरू न झाल्याने लिफ्ट आहे त्या ठिकाणी थांबल्या होत्या. कर्मचार्‍यांनी कसरत करत वेगवेगळ्या मजल्यावर लिफ्ट उभ्या करून आतील कर्मचारी व नागरिकांची सुटका केली. मात्र नंतर अन्य कर्मचार्‍यांना पायर्‍यांचा आधार घेऊन वर जावे लागले. सध्या घरप˜ीत सूट दिली जात असल्याने अनेक नागरिक नवीन वर्षाची घरप˜ी भरण्यासाठी मनपात आले होते त्यांना कसरत करत वरच्या मजल्यांवर जावे लागले. विविध विभागांमध्येही पंखे बंद झाल्याने कर्मचार्‍यांना तेथे बसणेही कठीण जात होते.