शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘काश्मीरच्या आझादी’चे पोस्टर दिसले जेएनयूमध्ये

By admin | Updated: March 4, 2017 04:33 IST

राष्ट्रवाद आणि बोलण्याचे स्वातंत्र्य यावर वाद सुरू असतानाच आता जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत (जेएनयू) काश्मीरच्या आझादीचे पोस्टर लागले आहेत

नवी दिल्ली : राष्ट्रवाद आणि बोलण्याचे स्वातंत्र्य यावर वाद सुरू असतानाच आता जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत (जेएनयू) काश्मीरच्या आझादीचे पोस्टर लागले आहेत. त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. डाव्यांची विद्यार्थी संघटना डेमोक्रेटिक स्टुडंट युनियनने (डीएसयू) हे पोस्टर लावल्याचे सांगितले जात आहे. जेएनयू परिसरात लागलेल्या या पोस्टरवर काश्मीर तसेच मणिपूरला स्वातंत्र्य, पॅलेस्टाइनमध्ये मुक्त वातावरण, जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. स्कूल आॅफ सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी हे पोस्टर बघितले आणि प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासनाने हे पोस्टर हटविण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले. याबाबत बोलताना विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हे पोस्टर येथे कोणी लावले याची माहिती नाही. विद्यापीठ परिसरातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. जेएनयूतील विद्यार्थी उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांनी मागील वर्षी अफझल गुरूच्या फाशीच्या निषेधार्थ विद्यापीठ परिसरात आंदोलन केले होते. त्यावरून मोठा वाद झाला होता. जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याच्यासह या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले होते. मात्र कन्हैया कुमारवरील आरोप सिद्ध करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. हे विद्यार्थी सध्या जामिनावर आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)>पोस्टर जुनेच?जेएनयूतील पोस्टरबाबत कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले, तर हे पोस्टर नेमके कधी लावले गेले याबाबतही वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. हे पोस्टर एक वर्षापासून येथे असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे, तर पोस्टर तीन-चार महिन्यांपूर्वी लावले गेले असल्याचे काही जण सांगतात. रामजस कॉलेजमधील वादाच्या पार्श्वभूमीवर या पोस्टरकडे आता लक्ष गेले असल्याचे सांगितले जात आहे. गुरमेहर कौर या विद्यार्थिनीने अभाविपच्या विरुद्ध आवाज उठविल्यानंतर या वादात राजकीय आणि अन्य क्षेत्रांतील अनेक प्रतिष्ठित मंडळींनी उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता या पोस्टरने नव्या वादाला तोंड फोडले आहे.