शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

पोस्टल सेवा ‘गतिमान’ दररोज 44 हजार पत्रे, रजिस्टरचा बटवडा

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

सोलापूर :

सोलापूर :
इंग्रजांच्या काळात उदयास आलेली डाक सेवा इंटरनेट युगात अधिक गतिमान बनली आह़े दररोज 44 हजार पत्रं आणि रजिस्टरचा बटवडा होतोय़ याशिवाय 2011 साली बंद झालेली किसान विकास पत्र योजना नुकतीच कार्यान्वित झाली आहे तर कोअर बँकिंग प्रणालीदेखील येत्या तीन महिन्यांत सुरू होत आह़े विभागीय कार्यालयाने बचतीच्या आणि विविध मनी पॉलिसीच्या योजना राबवून आर्थिक सक्षमतेच्या दिशेने पाऊल टाकले आह़े

257 गावांमध्ये पोस्ट कार्यालय
संपूर्ण जिल्?ात अधिकारी, कर्मचारी आणि पोस्टमन यांची एकूण संख्या ही 527 आह़े त्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागातील पोस्टमनची संख्या ही 111 आह़े पंढरपूर विभागात हे पोस्टमन दररोज 14000 साधी पत्रे आणि साडेतीन हजार स्पीड पोस्ट व रजिस्टर पत्रांचा बटवडा करतात़ तसेच सोलापूर विभागात दररोज 24,300 साधी पत्रे आणि 3000 स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्रांचा बटवडा करतात़ जिल्?ात 257 गावांमध्ये पोस्ट कार्यालये आहेत़ काही दिवसांपूर्वी या पोस्टमनच्या खाकी वर्दीचा रंग बदलण्याचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे गेला होता, मात्र तो रद्द झाला़ आता वर्दीचा रंग हा खाकीच राहिला आह़े दरवर्षी सोलापूर पोस्टातून जवळपास 6 अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होतात़ मात्र भरती त्या प्रमाणात नाही़ 2013 या वर्षात क्लार्कच्या चार जागा भरल्या आहेत़ गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात 27 पोस्टमनची भरती करण्यात आली आह़े

मनीग्राममध्ये मंगळवेढा तालुका आघाडीवर
मनीग्राम (वेस्टर्न युनियन मनी ट्रान्स्फर)मध्ये मंगळवेढा तालुका आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आह़े या तालुक्यातून दररोज किमान 22 लोक परकीय चलन मागवितात तर सोलापूर विभागातून 5 ट्रान्स्फर होतात़ तसेच पैसे पाठविण्याची ‘आयएमओ’ सेवा संपूर्ण भारतात चार वर्षांपूर्वी सुरू झाली़

मोटरसायकल लायसन्ससाठी ‘स्पेशल सेल’
आरटीओकडून मोटरसायकल लायसन्स चालकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोस्टावर सोपविण्यात आली आह़े बर्‍याचदा संबंधित व्यक्ती दिलेल्या पत्त्यावर राहत नाहीत, सापडत नाहीत म्हणून काही लायसन्स परत आरटीओला जमा केले जात होत़े आता या संबंधीच्या तक्रारी कमी करण्यासाठी पोस्टाने ‘स्पेशल सेल’ उभारले आह़े विजापूर रोडवर इंदिरानगर पोस्ट ऑफिसमध्ये हे सेल उभारण्यात आले आह़े जर ती व्यक्ती पत्त्यावर सापडत नसेल तर त्याचे लायसन्स पुढे दहा दिवस या सेलकडे ठेवले जाणार आह़े या सेलकडून संबंधित व्यक्ती लायसन्स हाती घेऊ शकत़े

कामाचे आधुनिकीकरण
पोस्ट कार्यालय आता आपल्या कामात आधुनिकीकरण आणत आह़े रजिस्टर पत्रे आणि स्पीड पोस्टाची नोंद आता संगणकावरून ती वेबसाईटवर होणार आह़े आपल्या रजिस्टर पत्रावरचा आयएमई नंबर त्या वेबसाईटवर टाकल्यास पत्राविषयीचा संपूर्ण तपशील संगणकावर मिळणार आहे.

ब्रिटिशकालीन इमारत
रेल्वे स्टेशन परिसरातील सोलापूर पोस्टाची मुख्य इमारत ही ब्रिटिशकालीन आह़े 1836 साली इंग्रजांनी ही इमारत उभारली़ मागील वर्षी या इमारतीने 175 वर्षे पूर्ण केली़ हा कालावधी पाहता मागील वर्षी या इमारतीचे नूतनीकरण झाले आणि याचे उद्घाटन 15 जुलै 2011 रोजी दूरसंचार मंत्री सचिन पायलट यांच्या हस्ते झाल़े आज ही इमारत देखण्या रूपात उभी असून, काही भाग जीर्ण झाले आहेत़

दोन विभागात सोलापूरची पोस्ट सेवा
पोस्ट सेवा ही सोलापूर आणि पंढरपूर या दोन विभागात विभागली गेली आह़े पंढरपूर विभाग : माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माढा़ सोलापूर विभागात: उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, बार्शी या तालुक्यांचा समावेश आह़े

मनी ऑर्डरला पर्याय आला ‘मनी इन्स्टंट’
मनी ऑर्डरला पर्यायी सेवा म्हणून मनी इन्स्टंट ही योजना आली आह़े मनी इन्स्टंटच्या माध्यमातून 50 हजार रुपयांपर्यंत पैसे पाठविण्याची र्मयादा आखली आह़े मनी ऑर्डरच्या माध्यमातून दहा हजार रुपये पाठवत असताना त्याला 500 रुपये कमिशन आकारले जायच़े मनी इन्स्टंटच्या माध्यमातून दहा हजारांना केवळ 100 रुपये कमिशन आकारले जात आह़े पोस्टाकडील पॉलिसी घेण्याकडे लोकांचा कल वाढला आह़े केवळ पॉलिसीच्या विश्वासार्हतेमुळे आणि फायदा देण्यात पुढे असल्यामुळे पोस्टल लाईफ इन्शुरन्स (पीएलआय) योजनेंतर्गत 20 कोटी 44 लाख 20 हजार रुपयांच्या पॉलिसी गेल्या काही वर्षात विकल्या गेल्या आहेत़ त्याचप्रकारे रूरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स योजनेला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद आह़े तसेच फ्रँकिंग मशीन आल्याने तिकिटाला चांगलाच पर्याय मिळाला आह़े

तीन महिन्यांत कोअर बँकिंग प्रणाली
येत्या तीन महिन्यांत सोलापूर विभागात 12 पोस्ट कार्यालयात कोअर बँकिंग प्रणाली सुरु होत आह़े अर्थात लाईट बिल, फोन बिल आणि ई-प्रणालीद्वारे सेव्हिंग खात्यावरुन भरता येणार आह़े यापैकी वीज बिलाचे सॉफ्टवेअर बसविण्याची प्रक्रिया सुरु आह़े दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे आणि पंढरपूर शहरात या सेवेला चांगला प्रतिसाद आह़े तसेच दाजीपेठ, गुरुनानक चौक आणि बार्शी शहरात रेल्वे बुकिंग सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आह़े ‘माय स्टँप’ला राज्यभरात चांगला प्रतिसाद लाभतोय, मात्र सोलापूर विभाग या सेवेच्या प्रतीक्षेत आह़े सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, पुणे विभागातून या योजनेला चांगला प्रतिसाद लाभतो आह़े

डाक सप्ताह ़़़
9 ऑगस्ट - जागतिक डाक दिवस
10 ऑगस्ट - बचत बँक दिवस
11 ऑगस्ट - डाक व बटवडा दिवस
13 ऑगस्ट - फिलेटेली दिवस
14 ऑगस्ट - बिझनेस डेव्हलपमेंट दिवस
15 ऑगस्ट - डाक जीवन बिमा दिवस