शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

शास्त्रीय संगीतातील आठ दिग्गजांवर टपाल तिकिटे

By admin | Updated: September 4, 2014 01:18 IST

भारतरन्न पं. भीमसेन जोशी यांच्यासह आठ दिग्गज गायक-वादक कलाकारांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी भारतीय टपाल खात्याने त्यांच्यावर विशेष टपाल तिकिटे काढली

नवी दिल्ली : असामान्य प्रतिभा आणि उत्तुंग कर्तृत्वाने भारतीय शास्त्रीय संगीताच्या समकालीन कालखंडावर स्वत:चा अमीट ठसा उमटविणा:या भारतरन्न पं. भीमसेन जोशी यांच्यासह आठ दिग्गज गायक-वादक कलाकारांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी भारतीय टपाल खात्याने त्यांच्यावर विशेष टपाल तिकिटे काढली असून या तिकिटांच्या संचाचे अनावरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बुधवारी झाले.
राष्ट्रपती भवनात झालेल्या या विशेष कार्यक्रमास दळवळणमंत्री रवी शंकर प्रसाद व टपाल विभागाच्या सचिव कावेरी बॅनर्जी उपस्थित होत्या. शास्त्रीय संगीत क्षेत्रतील ज्या दिग्गज कलाकारांवर ही तिकिटे काढली गेली आहेत त्यांत पं. भीमसेन जोशी, पं. रवीशंकर, पं. मल्लिकाजरुन मन्सूर, पं. कुमार गंधर्व, उस्ताद विलायत अली खान, उस्ताद अली अकबर खान आणि विदुषी डी. के. पट्टामल व गंगूबाई हनगळ यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती म्हणाले की, भारताची सांस्कृतिक परंपरा समृद्ध करण्यात या महान कलाकारांनी दिलेल्या योगदानाची मोजदाद करणो अशक्य आहे. आता हे कलाकार या टपाल तिकिटांच्या रूपाने जगभर पोहोचतील व भारतीय शास्त्रीय संगीताच्या सुवर्णकाळाच्या स्मृती चिरंतन ठेवतील. ते म्हणाले,  भारतीय शास्त्रीय संगीताचा उगम वेदांमधून झाला व ती एक दैवी देणगी (नादब्रrा) आहे, असे मानले जाते. म्हणूनच विकास आणि जागतिकीकरणाच्या भोवती फिरणा:या आजच्या भारतीय समाजजीवनात हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा जपणो महत्त्वाचे आहे.
राष्ट्रपती भवनात नव्याने सुरु झालेल्या वस्तुसंग्रहालयात टपाल तिकिटांचा हा संच कायमस्वरूपी प्रदर्शित केला जाईल व येत्या सप्ताहापासून अभ्यागतांना तो पाहता येईल.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
खा. विजय दर्डा यांचा आग्रह
4आपापल्या क्षेत्रत उत्तुंग कर्तृत्वाचा नवा मापदंड प्रस्थापित करणा:या पं. भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या असामान्य व्यक्तींचे टपाल तिकीट काढण्याबाबत राज्यसभा सदस्य खा. विजय दर्डा यांनी वेगळ्य़ा दृष्टिकोनातून आग्रह धरला होता. संबंधित व्यक्तीच्या निधनाला 1क् वर्षे उलटल्याखेरीज तिचे टपाल तिकीट न काढण्याचा नियम खात्याकडून पुढे केला जात होता. 
4तथापि, हा नियम निर्थक असल्याची भूमिका खा. दर्डा यांनी घेतली. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या कलावंताबद्दल जनमनातील आस्था कायम असतानाच्या काळातच हा नियम बाजूला ठेवून टपाल तिकीट काढले पाहिजे, किंबहुना हे कोण होते, अशी अनभिज्ञता समाजात येईर्पयत त्यासाठी वेळ काढता कामा नये, असा आग्रह खा. दर्डा यांनी धरला होता. परिणामी निधनाला चार वर्षे होण्याच्या आत पं. भीमसेन जोशींचे टपाल तिकीट जारी झाले आहे.