नवी दिल्ली : देशातल्या प्रत्येक गावात टपाल सेवा उपलब्ध करून देण्याकरिता सरकारने टपाल सेवा नेटवर्क योजनेच्या अंतर्गत 8क् ग्रामीण टपाल सेवा टपालघरे व 8क् सहायक टपालघरे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय न्याय आणि कायदा व दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी, ज्या गावातील लोकसंख्या तीन हजार आहे, ज्या एकल गावाची लोकसंख्या 5क्क् व डोंगराळ, वाळवंटी आणि आदिवासी भागातील लोकसंख्या एक हजार आहे तेथे टपाल कार्यालय उघडले जाईल असे सांगितले. देशाची टपालसेवा ही 15क् वर्षे जुनी असून त्याला अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने सरकार सगळे प्रयत्न करीत आहे. याबाबत अनेक संधी व आव्हाने आहेत, असेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
युनिव्हर्सल सव्र्हिस ऑब्लिगेशन फंड स्किम’अंतर्गत नक्षलग्रस्त भागात 15 महिन्यांत मोबाईल नेटवर्क उभारण्यात येईल, असे केंद्र सरकारने सांगितले.