शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट ग्रॅज्यूएट महिला पाकिटमाराला अटक

By admin | Updated: June 1, 2017 12:18 IST

फ्लुएंट इंग्रजी बोलणाऱ्या आणि पोस्ट ग्रॅज्यूएट असलेल्या महिलेने जर पाकिट मारलं तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल.

ऑनलाइन लोकमत

हावडा, दि. 1- रस्त्याने चालताना, ट्रेनमधून किंवा बसने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांच्या खिशातील पैशांची पाकिटं चोरीला गेल्याच्या घटना आपण ऐकत असतो. अनेकदा न शिकलेली किंवा बेरोजगार व्यक्ती अशी कामं करत असते. पण फ्लुएंट इंग्रजी बोलणाऱ्या आणि पोस्ट ग्रॅज्यूएट असलेल्या महिलेने जर पाकिट मारलं तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल. असाच  आश्चर्यकारक प्रकार बुधवारी पश्चिम बंगालमधील हावडा शहरात एका बसमध्ये घडला आहे. एका महिलेच्या पर्समधून पाच हजार रूपये चोरल्याप्रकरणी अंजली रॉय आणि पूजा रॉय या दोन पोस्ट ग्रॅज्यूएट झालेल्या महिला पाकिटमारांना पोलिसांनी अटक केली आहे. 
31 मे रोजी म्हणजेच बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सेरामपूर ते कुलगछीया दरम्यान बसमध्ये हा प्रकार घडला होता. स्वम्पा नावाची एक महिला आपल्या पतीसह बसमधून प्रवास करत होती. उलुबेरीयातील घुलीसानी येथे त्यांना जायचं होतं. बसमध्ये स्वम्पा मधल्या सीटवर बसली होती. अंजली  आणि पूजा तीच्या दोन बाजूला येऊन बसल्या. स्वम्पाचं बस स्टॉप जवळ येताच अंजली आणि पूजा सिग्नलवर उतरण्यासाठी दरवाजाजवळ गेल्या. त्या दोघींची सिग्नलवर उतरण्याची घाई बघून स्वम्पाने तीची पर्स तपासली. त्यावेळी आपल्या पर्समधील पाच हजार रूपये गायब झाल्याचं स्वम्पाच्या लक्षात आलं.  तेव्हा स्वम्पाने दरवाजाजवळ धाव घेतली आणि अंजलीवर चोरीचा आरोप लावला.  चोरीच्या आरोपामुळे चिडलेल्या अंजलीने फ्लुएंट इंग्रजीत स्वम्पासोबत वाद घालायला सुरूवात केली. सभ्य आणि उच्चशिक्षित महिलेवर चोरीचा आरोप करण्याची हिंमत कशी होते, असा सवाल अंजलीने स्वम्पाला केला. 
जर माझ्याकडे पैसै सापडले नाहीत तर सगळ्यांच्या समोर तुला माफी मागावी लागेल, अशी अट अंजलीने ठेवली. ही अट मान्य करत बसमधील इतर प्रवाशांनी आणि स्वम्पाने तीला तिचे दोन्ही हात वर करायला लावले असताना अंजलीने साडीत लवलेला पैशांचा गठ्ठा खाली पडला. यानंतर अंजली आणि पूजा दोघींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. 
पोलिसांच्या चौकशीमध्ये या दोघींनीही गुन्ह्याची कबूली दिली आहे. अंजलीने सात-आठ महिन्यापूर्वी पूजाला पाकिटमारीच्या कामात आणलं होतं. उत्पनाचं कोणतंही साधन न मिळाल्याने मी प्रवाशांची पाकिटं मारायला सुरूवात केली होती अशी कबूली अंजलीने दिली आहे. "अंजलीला तीच्या पतीने सोडलं होतं आणि आई-वडीलांसह बर्दवानमध्ये राहायला भाग पाडलं होतं, म्हणुन ती पाकिटमारीचं काम करते आहे, अशी माहिती चौकशी दरम्यान अंजलीने पोलिसाना दिली आहे. विशेष म्हणजे अंजलीचं एमए झाल्याची माहिती तीने पोलिसांना दिली आहे.