पोस्ट गावगिरी बेती-वेरे
By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST
नदी परिवहन खाते देते ७ रुपयात जेवण
पोस्ट गावगिरी बेती-वेरे
नदी परिवहन खाते देते ७ रुपयात जेवण पोस्ट गावगिरीबेती-वेरे नदी परिवहन खात्यामार्फत कर्मचार्यांना जेवण भत्ता म्हणून सात रुपये प्रति जेवण दिले जातात. तो भत्ताही तब्बल अडीच वर्षांपासून मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती आहे. नदी परिवहन खात्यातर्फे गोवाभर नदीपात्र ओलांडण्यासाठी फेरीबोटी चालविल्या जातात. त्यावर काम करणारे कर्मचारी चोवीस तास काम व चोवीस तास सुी या पद्धतीवर काम करतात. कामाच्या २४ तासांत ७ रुपये प्रति जेवण मिळून दोन जेवणाचे १४ रुपये व २ चहा-नाश्त्याचे ४ रुपये मिळून एकूण त्यांना दिवसाला १८ रुपये भत्ता दिला जातो. सध्या बाजारभावाप्रमाणे १०० रुपये प्रति जेवण, चहा-नाश्त्यासाठी ३० रुपये मिळून दररोज २६० रुपये खर्च येतो. असे असताना सरकारमार्फत दिला जाणारा १८ रुपये भत्ता म्हणजे कर्मचार्यांची क्रूर था आहे. त्यांची पिळवणूक आहे. या प्रकरणी अधिक माहिती घेण्यास नदी परिवहन खात्याच्या कार्यालयाकडे संपर्क साधला असता काहीही थकीत नसून येथून बिले अकाउंट विभागाकडे पाठविली जातात; परंतु ती मंजूर होण्यास अकाउंट विभागाकडून विलंब होतो. भत्ता अत्यल्प असूनही कर्मचार्यांना तो अडीच वर्षांपासून मिळाला नाही, हा आपल्या सरकारी कामाचा जिवंत पुरावा म्हणता येईल. याच नदी परिवहन खात्याच्या कर्मचार्यांना दिला जाणारा शिलाई भत्ताही वर्षातून एकदा फक्त ७५ रुपये दिला जात आहे. बाजारभावाप्रमाणे दोन युनिफॉर्म शिलाईसाठी ६५० रुपये लागतात. ही म्हणजे आणखी एक क्रूर चेा. अशा जीवघेण्या भयावह विषमतेत जगताना माणसे हिंसेचा मार्ग स्वीकारत असतील का? दिनेश केळुस्कर