शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांची गर्दी घटण्याची शक्यता अल्प प्रतिसाद : परिवहन महामंडळाच्या अडीच हजार बस उभ्याच

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

नाशिक : बारा वर्षांनी येणार्‍या कुंभमेळ्याविषयी उत्सुकता असली तरी आत्तापर्यंत भाविकांचा जेमतेम प्रतिसाद मिळाला आहे. रात्री साडे नऊ वाजेपर्यंत केवळ बारा हजार भाविकांची वाहतूक केली असल्याचे परिवहनतर्फे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर परिवहन महामंडळाने राज्यभरातून मागविलेल्या तीन हजार बसगाड्यांपैकी २४०० बस तर रात्री नऊ वाजपर्यंत जागच्या हलल्या नाहीत असे एसटीच्या सूत्रांनी सांगितले.

नाशिक : बारा वर्षांनी येणार्‍या कुंभमेळ्याविषयी उत्सुकता असली तरी आत्तापर्यंत भाविकांचा जेमतेम प्रतिसाद मिळाला आहे. रात्री साडे नऊ वाजेपर्यंत केवळ बारा हजार भाविकांची वाहतूक केली असल्याचे परिवहनतर्फे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर परिवहन महामंडळाने राज्यभरातून मागविलेल्या तीन हजार बसगाड्यांपैकी २४०० बस तर रात्री नऊ वाजपर्यंत जागच्या हलल्या नाहीत असे एसटीच्या सूत्रांनी सांगितले.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या प्रत्येक पर्वणीसाठी किमान एक लाख भाविक येतील असा अंदाज सर्वच शासकीय यंत्रणांनी तयार केला आणि त्या आधारे आराखडे तयार केले. परंतु पहिल्या पर्वणीला पूर्वसंध्येला मिळणारा प्रतिसाद बघितला तर तो तुर्तास तरी प्रशासनाचा अंदाज चुकविणारा ठरला आहे. नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर येथे येणारी सर्व प्रकारची खासगी वाहने बा‘ वाहनतळावर अडवून ठेवण्यात आली असून तेथून अंतर्गत वाहनतळापर्यंत केवळ एसटी बसनेच प्रवास करता येऊ शकतो. त्यामुळे रेल्वेचा एक अपवाद सोडला तर रस्त्याने येणार्‍या भाविकांचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे मत सरकारी अधिकारी व्यक्त करीत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने नाशिकमध्ये असलेल्या साडे सातशे बसगाड्या वगळता अन्य जिल्‘ातून बस गाड्या मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना नेण्यासाठी तीन हजार बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु रात्री साडे नऊ वाजेपर्यंत महामंडळाने केवळ १२ हजार भाविकांची वाहतूक केली होती. आणि महामंडळाच्या २४०० बस जागच्याही हलल्या नाहीत असे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले. सर्वाधिक फेर्‍या खंबाळे ते त्र्यंबक अशा २६४ झाल्या होत्या. मोहदरी ते सिन्नरफाटा ४७ झाल्या होत्या. महामंडळाने तयार केलेल्या शंभर रुपये किमतीच्या तीन लाख पास पैकी केवळ ४८८ पास विकले गेले आहेत. शंभर रुपयांत नाशिक- त्र्यंबकेश्वर अशा दोन्ही ठिकाणी बस प्रवास करण्याची सुविधा आहे.