शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पुन्हा रडविण्याची शक्यता

By admin | Updated: July 1, 2015 01:22 IST

पुढच्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. यंदा खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठोक आणि किरकोळ

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीपुढच्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. यंदा खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठोक आणि किरकोळ बाजारात आतापासूनच कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे.दिल्लीसह अन्य महानगरांमध्ये कांद्याच्या दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सरकारने कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात लाक्षणिक वाढही केलेली आहे आणि प्रसंगी कांद्याची आयात केली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. तथापि ‘साठा मर्यादे’बाबत (स्टॉक लिमिट) कृषी आणि वित्त मंत्रालयाने वेगवेगळे मत दिल्यामुळे सरकारही संभ्रमात सापडले आहे.आज बुधवारी नवी दिल्लीत होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काही ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सरकारने या वर्षासाठी कांद्याचे किमान निर्यात मूल्य प्रति टन २५० डॉलरवरून वाढवून ते ४२५ डॉलर केले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. कांद्याच्या उत्पादनात होणारी संभाव्य घट आणि त्यामुळे किमती वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्राहक कामकाज मंत्रालयाने कांद्याचा साठा करून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ करण्याच्या संदर्भात एक कॅबिनेट नोट तयार केलेली आहे. कृषी मंत्रालयाने या कॅबिनेट नोटवर आपली टिप्पणी केलेली आहे. खरीप हंगामात कांद्याच्या उत्पादनात किमान २० टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त करून, कांद्याचा साठा करण्याच्या क्षमतेत वाढ करण्याच्या ग्राहक कामकाज मंत्रालयाच्या प्रस्तावावर कृषी मंत्रालयाने सहमती दर्शविली आहे. तथापि, साठा क्षमता वाढविणे अनावश्यक असल्याचे मत वित्त मंत्रालयाने व्यक्त केले आहे, असे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ केल्यावरून महाराष्ट्रासह अन्य काही कांदा उत्पादक राज्यांमधील शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. यामुळे कांदा निर्यातीत घट होणार असली तरी त्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होणार आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याउलट कांद्याचा पुरवठा वाढला आहे आणि त्यामुळे किमतीतही घट झाली आहे, असा दावा सरकारने केला.