शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संसदेतील कोंडी कायम राहण्याची शक्यता

By admin | Updated: July 31, 2015 01:44 IST

संसदेतील कोंडी आज शुक्रवारी आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

- जयशंकर गुप्त, नवी दिल्लीसंसदेतील कोंडी आज शुक्रवारी आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी गेल्या २१ जुलैपासून संसदेचे कामकाज ठप्प पाडलेले आहे. संसदेतील कामकाज सुरळीत चालावे म्हणून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती; पण कोंडी न फुटल्याने ही बैठक निष्फळ ठरली.संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालविण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारनेच कोंडी निर्माण झाल्याची कारणे दूर करून कामकाज सुरळीत करण्याचे सुनिश्चित केले पाहिजे, असे लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. स्वराज, राजे आणि चौहान यांनी राजीनामा देईपर्यंत संसदेचे कामकाज ठप्प पाडण्याच्या आपल्या भूमिकेवर काँग्रेस आणि विरोधी पक्ष कायम आहेत, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, गुरुवारी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि अन्य दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर लोकसभेत कामकाज दिवसभरासाठी, तर राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे संकेतसुषमा स्वराज यांच्यासह भाजप नेत्यांच्या राजीनाम्याच्या विरोधकांच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची आपली तयारी असल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.