शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

स्फोट आरडीएक्समुळे झाल्याची शक्यता?

By admin | Updated: September 14, 2015 01:28 IST

मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील पेटलावद येथे शनिवारी झालेला भीषण स्फोट बहुधा आरडीएक्स अथवा त्याहीपेक्षा अधिक शक्तिशाली स्फोटांमुळे घडला असावा,

नवी दिल्ली/औरंगाबाद/झाबुआ : मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील पेटलावद येथे शनिवारी झालेला भीषण स्फोट बहुधा आरडीएक्स अथवा त्याहीपेक्षा अधिक शक्तिशाली स्फोटांमुळे घडला असावा, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांनी म्हटले आहे. या स्फोटात ९० जण ठार आणि शंभरावर लोक जखमी झाले आहेत.महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना मोहन प्रकाश म्हणाले, एवढा भीषण स्फोट एका सिलिंडरमुळे झाला असेल, यावर विश्वास बसत नाही. हा स्फोट आरडीएक्स किंवा त्याहीपेक्षा अधिक शक्तिशाली स्फोटांमुळे झाला असणार. कारण या स्फोटात चार बहुमजली इमारती पूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने त्याचा तपास केला पाहिजे.दरम्यान, स्थानिक भाजपा नेत्याला नियम धाब्यावर बसवून वर्दळीच्या भागात स्फोटके साठवून ठेवण्याची परवानगी देण्यात आल्यामुळेच हे भीषण स्फोटकांड घडले, असा स्पष्ट आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी नवी दिल्ली येथे केला. ‘मुख्यमंत्र्यांनी आरोपींविरुद्ध कोणती कारवाई केली? चौहान यांच्या राजवटीखालील मध्यप्रदेश आता ‘मृत्यूचे राज्य’ बनले आहे, असे सिंघवी यांनी म्हटले आहे.हे कसे घडले? भाजपाच्या व्यापार मंडळाचा जिल्हा प्रमुख पेटलावदच्या मध्य भागात हा स्फोटकांचा कारखाना चालवीत होता. तो भाजपाचा नेता नसता तर स्थानिक प्रशासनाने त्याला हा कारखाना चालविण्याची परवानगी दिली असती काय, असा सवाल सिंघवी यांनी केला. आता चौहान यांच्या राजवटीत व्यापमं घोटाळ्यात अनेक जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता हे शंभर लोक मारले गेले आहेत, असे ते म्हणाले. पेटलावद येथील भीषण स्फोटानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना प्रक्षुब्ध जमावाचा विरोध आणि रोषाचा सामना करावा लागला. रविवारी सकाळी १० वाजता चौहान यांचा ताफा पेटलावदच्या शासकीय रुग्णालयाजवळ दाखल होताच जमाव संतप्त झाला.यावेळी जमावाने चौहान यांना घेराव केला आणि प्रशासन व पोलिसांच्या विरोधात नारेबाजी केली. लोकांचा रोष लक्षात घेऊन स्वत: चौहान हे कारमधून उतरले आणि रस्त्यावर बसले. यावेळी त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या स्फोटाची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश दिला.(लोकमत न्यूज नेटवर्क)