शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अद्रमुक नेते दिनकरन यांना अटक होण्याची शक्यता

By admin | Updated: April 18, 2017 01:02 IST

अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे (अम्मा) उप सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन यांची चौकशी करण्यासाठी...

हरीश गुप्ता, नवी दिल्लीअखिल भारतीय अण्णा द्रमुकचे (अम्मा) उप सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची तुकडी चेन्नईला रवाना झाली आहे. अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाचे दोन पाने हे निवडणूक चिन्ह आपल्या गटाला मिळावे यासाठी दिनकरन यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला १.३० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला, असा त्यांच्यावर आरोप आहे व तसा गुन्हाही दिल्ली पोलिसांनी दाखल केला.तामिळनाडूतील आर. के. नगर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक आयकर विभागाच्या छाप्यांनंतर रद्द झाली व या निवडणुकीत पैशांचा वापर झाला होता. दिनकरन यांनी आर. के. नगर मतदार संघातील मतदारांना लाच द्यायचा प्रयत्न केल्याबद्दल, आयकर आणि सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. पैशांच्याच कारणावरून ही पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली. या प्रकरणी दिनकरन यांना अटक होण्याची शक्यता आहे. दोन पाने हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी दिनकरन यांनी सुकेश चंद्रशेखर याच्यामार्फत अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. अ. भा. अ. द्रमुक पक्षात फूट पडल्यामुळे दोन पाने हे चिन्ह सध्या आयोगाने गोठवले आहे. या पोट निवडणुकीसाठी आयोगाने दोन्ही गटांना पर्यायी चिन्ह दिले आहे. दिनकरन हे शशीकला यांचे भाचे असून, सध्या शशीकला या बंगळुरुतील तुरुंगात आहेत. शशीकला यांनी दिनकरन यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवली आहे.दिल्ली पोलिसांनी सुकेश चंद्रशेखर याला दक्षिण दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमधून रविवारी अटक केल्यावर लाचेचे हे प्रकरण उघडकीस आले. गोठवण्यात आलेले दोन पाने हे चिन्ह तुमच्या गटाला मी मिळवून देऊ शकतो, अशी खात्री चंद्रशेखर याने दिनकरन यांची भेट घेऊन दिली होती व त्या जाळ््यात दिनकरन सापडले. दिनकरन यांनी १.३० कोटी रुपये आगावू दिले. ही रक्कम चंद्रशेखर याची निवडणूक अधिकाऱ्यांना देण्याची योजना होती. दिनकरन हे चंद्रशेखर याच्या थेट संपर्कात होते. त्यांच्या फोनचा तपशीलही उपलब्ध आहे. माझी संघटना राजकीयदृष्ट्या नाहीशी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप टीटीव्ही दिनकरन यांनी केला. या खटल्याला मी संघर्षाने तोंड देईन. मी कोणालाही लाच दिली नाही, मी सुकेश चंद्रशेखर यांना ओळखत नाही. एखादा मध्यस्थ किंवा अन्य कोणी तरी पैसे हे टीटीव्ही दिनकरन यांच्याकडून आले, असे कसे म्हणू शकतो? त्या नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. त्याला बघितले नाही. - टीटीव्ही दिनकरन