कत्तलीच्या जनावरांचा ताबा गौ संस्थेकडे
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
हायकोर्टाचा दिलासा : गोंदिया जिल्ातील प्रकरण
कत्तलीच्या जनावरांचा ताबा गौ संस्थेकडे
हायकोर्टाचा दिलासा : गोंदिया जिल्ह्यातील प्रकरणनागपूर : पोलिसांनी जप्त केलेली कत्तलीची ४२ जनावरे विविध अटींसह भवानी बहुउद्देशीय गौ संरक्षण संस्थेला सुपुर्दनाम्यावर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत.४ एप्रिल २०१३ रोजी डुग्गीपार (गोंदिया) पोलिसांनी देवरी-सौंदड रोडवर जनावरे वाहून नेणारे तीन ट्रक पकडले. जनावरांना अत्यंत निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येत होते. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून सर्व जनावरे भवानी संस्थेला देखभालीसाठी दिले. १६ एप्रिल २०१३ रोजी सडक अर्जुनी येथील प्रथम श्रेणी न्यायादंडाधिकारी आर. आर. भागवत यांनी संस्थेच्या सुपुर्दनाम्यावर जनावरे देण्याचा अर्ज फेटाळून जनावरे ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात हलविण्याचे पोलिसांना निर्देश दिलेत. या निर्णयाला संस्थेचे सचिव नानाजी जीवतोडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. राजेंद्र डागा व ॲड. मोहित खजांची यांनी बाजू मांडली.