शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्न साईट्सवर बंदी घालणं शक्य नाही - सुप्रिम कोर्ट

By admin | Updated: July 9, 2015 17:37 IST

भारतात केंद्र सरकारला इंटरनेटवर पाहिल्या जाणा-या पॉर्नोग्राफिक कन्टेंटवर निर्बंध घालणे सध्या तरी शक्य नसल्याचे दिसून येते. कारण पॉर्न वेबसाईट्स ब्लॉक

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,  ९ -  भारतात केंद्र सरकारला इंटरनेटवर पाहिल्या जाणा-या पॉर्नोग्राफिक कन्टेंटवर निर्बंध घालणे सध्या तरी शक्य नसल्याचे दिसून येते. कारण पॉर्न वेबसाईट्स ब्लॉक करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीगत स्वातंत्र्याची गळपेची करण्यासारखे असल्याचे सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे. 
केंद्र सरकारला इंटरनेटवर पाहिल्या जाणा-या पॉर्न वेबसाईट्स, व्हिडिओ आणि पॉर्न मजकूर ब्लॉक करण्याचे किंवा त्यावर निर्बंध घ्यालण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सुप्रिम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
संविधानाच्या अनुच्छेद -२१ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक स्वातंत्र असून याबाबत कोर्ट कोणताही अंतरिम आदेश देऊ शकत नाही. कारण एखादी व्यक्ती कोर्टात येऊन सांगू शकते की, मी प्रौढ व्यक्ती असून तुम्ही मला माझ्याच घरात किंवा चार भिंतीच्या रुममध्ये पॉर्न व्हिडीओ पाहण्यापासून कसं काय रोखू शकता? हे घटनेच्या कलम २१चं उल्लंघन आहे. मात्र हा गंभीर मुद्दा असून त्याबाबत लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे.  याबाबत केंद्र सरकारने पॉर्न वेबसाईट्सवर बंदी घालण्याची भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी दिला आहे. तसेच सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने केंद्रीय गृहमंत्रालयाला यासंदर्भात सविस्तर प्रतिज्ञपत्र सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.
आता सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयावर केंद्र सरकार कोणती पावलं उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.