शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ५ मे रोजी मतदान

By admin | Updated: March 31, 2015 00:24 IST

९७ व्या घटनादुरुस्तीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्रपणे ‘राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले.

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक वेळापत्रकावर प्रशासनाने शेवटचा हात फिरविला असून, दि. ४ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल, तर मतदानाचा मुहूर्त दि. ५ मे रोजी असेल. मतमोजणी दि. ७ मे रोजी होईल. दरम्यान, कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक राजेंद्र दराडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.जिल्हा बँकेची निवडणूक महसूल विभागानेच घ्यावी, अशी सूचना राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी केली होती. त्यानुसार सातारचे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; पण ते प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी विनंती केल्यामुळे सातारा जिल्हा बँकेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कोण असणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. जिल्हा बँकेची निवडणूक सहकार विभागाच्या अखात्यारित होत असली तरी प्रत्येक वेळी झालेली निवडणूक प्रक्रिया महसूल विभागानेच राबविली. मात्र, ९७ व्या घटनादुरुस्तीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्रपणे ‘राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले. त्याच्या आयुक्तपदी मधुकर चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा बँकेची निवडणूक महसूल विभागानेच घ्यावी, अशी सूचना चौधरी यांनी केली होती. त्यानुसार दि. ३० मार्चला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार होती. त्यासाठी प्रांताधिकारी माने यांची नियुक्ती झाली; पण त्यांनी प्रतापगड कारखाना निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी असल्याचे सांगितले. आता त्यांच्याऐवजी कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक डॉ. दराडे यांची नियुक्ती झाली आहे. (प्रतिनिधी)असा असेल कार्यक्रम !दि. ४ ते ८ एप्रिल अर्ज भरणे, दि. ९ रोजी अर्जांची छाननी, दि. ११ ते २४ एप्रिलपर्यंत अर्ज माघार घेणे. दि. ५ मे रोजी मतदान आणि ७ मे रोजी मतमोजणी असा निवडणूक कार्यक्रम असण्याची शक्यता आहे. यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.