शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी खुले मतदान?

By admin | Updated: August 10, 2016 03:50 IST

विधान परिषद निवडणुकीसाठी खुली मतदान पद्धती घेण्याबाबत केंद्र सरकारने राज्यांची मते मागविली आहेत. पैशांचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी राज्यसभा निवडणुकीच्या धर्तीवर हे प्रयत्न सुरू आहेत

नवी दिल्ली : विधान परिषद निवडणुकीसाठी खुली मतदान पद्धती घेण्याबाबत केंद्र सरकारने राज्यांची मते मागविली आहेत. पैशांचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी राज्यसभा निवडणुकीच्या धर्तीवर हे प्रयत्न सुरू आहेत. कायदा मंत्रालयाचे अधिकारी आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी यांच्यात जानेवारीत झालेल्या एका बैठकीत निवडणूक आयोगाने हा मुद्दा उपस्थित केला होता. कायदामंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी त्यानंतर या प्रकरणी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही दिले आहे. या पद्धतीनुसार विधान परिषदेसाठी मतदान करणाऱ्या आमदाराला आपल्या पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला ती मतपत्रिका दाखवावी लागेल. द्विसदनप्रणाली असणाऱ्या सात राज्यांपैकी आंध्र प्रदेश, तेलंंगणा आणि बिहारने आयोगाला पाठविलेल्या आपल्या उत्तरात खुल्या मतदान पद्धतीचे समर्थन केले आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश या राज्यांत विधान परिषद आहे. निवडणूक आचरण नियमावली, १९६१ च्या नियम ३९ एए नुसार राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी प्रत्येक मतदाराला (आमदाराला) मतपेटीत मतपत्रिका टाकण्यापूर्वी पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवावी लागते. ही मतपत्रिका दाखविण्यास विरोध करणाऱ्या आमदाराची मतपत्रिका बाद ठरू शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)