शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमधील राजकीय पेच कायम

By admin | Updated: December 30, 2014 23:44 IST

पीडीपी आणि दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा दोन्हींकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने सत्तास्थापनेबाबत कुठलेही ठोस संकेत मिळालेले नाहीत़

श्रीनगर/जम्मू : जम्मू-काश्मिरात नवे सरकार स्थापनेबाबतचा राजकीय पेच अद्यापही कायम आहे़ सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला पीडीपी आणि दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा दोन्हींकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने सत्तास्थापनेबाबत कुठलेही ठोस संकेत मिळालेले नाहीत़जम्मू-काश्मीरच्या ८७ सदस्यीय विधानसभेत २८ सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती उद्या बुधवारी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत़ तर भाजपा येत्या गुरुवारी आपला औपचारिक प्रस्ताव सादर करण्याच्या तयारीत आहे़पीडीपी सर्व पर्यायांवर विचार करीत असून, राजकीय पेच अद्यापही कायम आहे. मेहबूबा मुफ्ती बुधवारी राज्यपालांना भेटणार आहेत, असे पीडीपी प्रवक्ते नईम अख्तर यांनी मंगळवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले़ नव्याने निवडणुका घ्या : जेकेएनपीपीजम्मू : जम्मू-काश्मिरात राजकीय पक्षांकडून घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप जेकेएनपीपीने केला आहे़ हा घोडेबाजार रोखण्यासाठी राज्यपालांनी राजकीय पक्षांसोबतची चर्चा रद्द करावी आणि राज्यात नव्याने निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही या पक्षाचे अध्यक्ष भीमसिंह यांनी मंगळवारी केली़लोन यांना हवे स्थिर सरकारपीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद गनी लोन यांनी जम्मू-काश्मिरातील स्थिर आघाडी सरकारची अपेक्षा व्यक्त केली आहे़ आम्ही राज्यात कुठल्याही स्थिर सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत़, असे लोन म्हणाले़(वृत्तसंस्था)जम्मू-काश्मिरातील राजकीय पेच कायम असताना, नॅशनल कॉन्फरन्सच्या (एनसी) १५ सदस्यीय विधिमंडळ दलाने एक प्रस्ताव संमत करून पीडीपीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे़ एनसीचे सरचिटणीस अली मोहम्मद सागर यांनी मात्र हे वृत्त स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे़ पीडीपीला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांना आमच्या नेतृत्वाशी चर्चा करावी लागेल, असे आम्ही तोंडी स्वरूपात म्हटलेले आहे़ मात्र पीडीपीला पाठिंबा देणारा प्रस्ताव संमत करण्याबाबतचे वृत्त निराधार आहे, असे ते म्हणाले़श्रीनगर : जम्मू-काश्मिरात भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याबाबत काँग्रेसने पीडीपीला सावध केले आहे़ पीडीपीचे संरक्षक मुफ्ती मोहम्मद सईद राज्यातील वर्तमान राजकीय स्थितीत सर्वाधिक योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे़ केंद्रातील सत्तारूढ वर्गाकडून विशेष लाभ घेण्यासाठी पीडीपीला भाजपासोबत सरकार स्थापन केले पाहिजे, असा सल्ला मुफ्ती मोहम्मद सईद यांना दिला जात आहे़ पण मी वैयक्तिकरीत्या सईद यांना विकासाच्या नावावर दिल्या जाणाऱ्या या सल्ल्याबाबत सावध करू इच्छितो़ हा सल्ला म्हणजे दूरदृष्टीचा अभाव असलेला सल्ला आहे, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सैफुद्दीन सोज मंगळवारी म्हणाले़जम्मू : जम्मू-काश्मिरातील सरकार स्थापनेच्या चर्चेसाठी भाजपाच्या द्विसदस्यीय शिष्टमंडळाने आज मंगळवारी राज्यपाल एऩएऩ व्होरा यांची भेट घेतली़ येत्या गुरुवारी पक्ष राज्यपालांना आपला औपचारिक प्रस्ताव सादर करील, असे या शिष्टमंडळाने सांगितले़ भाजपा सरचिटणीस राम माधव आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुगल किशोर शर्मा यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली़ यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षनेते येत्या १ जानेवारी रोजी राज्यपालांची भेट घेऊन, त्यांना सरकार स्थापनेबाबतचा आपला प्रस्ताव सोपवतील़ राज्यपालांसोबतची आजची भेट राज्यात सरकार स्थापनेच्या प्रक्रियेचा एक भाग समजता येईल़ सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे़ या प्रक्रियेदरम्यान राज्यपालांसोबत चर्चा होते़ मात्र १ तारखेला आम्ही त्यांच्याशी औपचारिक चर्चा करू.