शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा गटनेता व विरोधी पक्षनेता बदलणार नगरसेवकांनी घेतली खडसेंची भेट: सुनील माळी यांचे नाव आघाडीवर

By admin | Updated: July 4, 2016 00:45 IST

जळगाव: भाजपाच्या गटनेता व विरोधी पक्षनेत्यांची १ वर्षांची मुदत ठरलेली असतानाही अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही बदल करण्यात आलेला नसल्याने नगरसेवकांनी रविवारी दुपारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर सर्व नगरसेवकांनी याबाबतचे लेखी निवेदन खडसेंना सादर केेले. त्यानुसार दोन्ही पदांवर अन्य सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातही गटनेतेपदासाठी सुनील माळी यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

जळगाव: भाजपाच्या गटनेता व विरोधी पक्षनेत्यांची १ वर्षांची मुदत ठरलेली असतानाही अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही बदल करण्यात आलेला नसल्याने नगरसेवकांनी रविवारी दुपारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर सर्व नगरसेवकांनी याबाबतचे लेखी निवेदन खडसेंना सादर केेले. त्यानुसार दोन्ही पदांवर अन्य सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातही गटनेतेपदासाठी सुनील माळी यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.
मनपात सत्ताधारी खाविआने सर्व सदस्यांना संधी मिळावी, यासाठी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, गटनेता ही पदे सहा महिने, वर्षभरासाठी देण्याची पद्धत रूढ केली आहे. इतर राजकीय पक्षांनीही त्याचा अनुनय करीत गटनेतेपद बदलते ठेवले आहे. भाजपाचाही गटनेता पूर्वी वर्षभरासाठीच असे. मात्र या टर्मममध्ये गटनेतेपदी डॉ.अश्वीन सोनवणे, विरोधी पक्षनेतेपदी वामनराव खडके यांची निवड झाल्यानंतर अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही तेच या पदावर कायम आहेत. त्याबाबत कुणा सदस्याची बोलण्याची हिंमतही झाली नाही. अखेर रविवारी सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यात या विषयावर चर्चा झाली.
गटनेता एकनिष्ठ असावा
यावेळी खडसे यांनी १ वर्षात गटनेता व विरोधी पक्षनेता बदलाची रित होती, तर तसे आपल्या निदर्शनास आणून द्यायला हवे होते, असे सांगितले. तसेच पदांमध्ये बदल करण्याची तयारीही दर्शविली. मात्र या पदावर ज्येष्ठ, कनिष्ठ सभासद असा भेद न करता एकनिष्ठता व सभागृहात परखडपणे पक्षाची बाजू मांडणारा सदस्य असा निकष लावण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी काही सदस्यांनी गटनेतेपदासाठी सुनील माळी यांचे नाव सुचविले. मात्र अद्याप दोन्ही पदांबाबत निर्णय झालेला नसल्याचे समजते.
१५ पैकी १३ सदस्यांची उपस्थिती
यावेळी गटनेते डॉ.अश्विन सोनवणे व विरोधी पक्षनेते वामनराव खडके हे बाहेरगावी गेलेले असल्याने अनुपस्थित होते. मात्र उर्वरीत सर्व १३ सदस्य उपस्थित होते. तसेच आमदार सुरेश भोळे, आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी हे देखील उपस्थित होते.