शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

देणग्या उघड करण्यास राजकीय पक्षांचा विरोध

By admin | Updated: April 18, 2015 00:20 IST

२० हजारांपेक्षा कमी असलेल्या देणग्याही जाहीर करणे बंधनकारक करण्याच्या विधी आयोगाने केलेल्या शिफारशीवर राजकीय पक्षांमध्ये मतैक्य होऊ शकले नाही.

नवी दिल्ली : छोट्या देणग्यांमधून मिळणारा एकूण निधी २० कोटींपेक्षा जास्त असल्यास २० हजारांपेक्षा कमी असलेल्या देणग्याही जाहीर करणे बंधनकारक करण्याच्या विधी आयोगाने केलेल्या शिफारशीवर राजकीय पक्षांमध्ये मतैक्य होऊ शकले नाही.राजकीय पक्षांनी देणग्यांचा तपशील न दिल्यास दंड ठोठावण्याच्या मुद्यावरही सहमती होऊ शकली नाही. निवडणूक आयोगाने खोटी माहिती देणाऱ्यांवर ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा प्रस्ताव ठेवला, मात्र काही पक्षांनी विशेषत: छोट्या पक्षांनी ही रक्कम खूप जास्त होत असल्याचे सांगत विरोध नोंदविला. निवडणूक सुधारणांबाबत नव्या विधी आयोगाचा अहवाल तसेच सरकारी निवडणूक खर्चाच्या मुद्यावर निवडणूक आयोगाने ३० मार्च रोजी घडवून आणलेल्या सल्लामसलतीच्या आधारे मसुदा दस्तऐवज जारी केला आहे. देणग्या जाहीर करण्याची शिफारस विधी आयोगाने केली असली तरी राजकीय पक्षांना ती प्रत्यक्षात आणणे शक्य नाही. २० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या देणग्या जाहीर करण्याचा सल्ला दिला जाऊ शकत नाही, असा सूर विविध पक्षांनी व्यक्त केला होता. आयोगाने मसुद्यात ही बाब स्पष्ट केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)काय आहेत शिफारशी? च्छोट्या देणग्यांतून मिळालेला निधी अथवा अशा देणग्यांच्या एकूण प्रमाणाच्या २० टक्के रक्कम (कमी असेल ती)२० कोटींपेक्षा जास्त असल्यास छोट्या देणग्या जाहीर करणे अनिवार्य करावे. त्यासाठी निवडणुकीचे संबंधित नियम आणि आयकर कायद्यात बदल केला जावा, असे विधी आयोगाने शिफारशीत म्हटले . खोटी माहिती देणाऱ्यास ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा प्रस्ताव.मतभिन्नतेचे मुद्दे...च्निवडणूक निधीबाबत खोटी माहिती देणे की नावांमधील चूक अथवा पत्त्यातील चुकीसाठी अशा प्रकारचा दंड ठोठावणार काय? असा प्रश्न चर्चेत सहभागी प्रतिनिधींनी विचारला. कंपन्यांचा निधी राजकीय उद्देशासाठी वापरण्यावर संबंधितांची मंजुरी मिळविण्याची शिफारस आयोगाने केली असली तरी त्यावरील मतभेद उघड झाले. सध्याच्या वातावरणात देणगीपूर्व परवानगी मिळविणे अशक्य आहे. पारदर्शकतेसाठी देणग्यांना नंतर मंजुरी मिळवता येऊ शकते, असे काही प्रतिनिधींनी स्पष्ट केले.