शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांचा ‘हवाई’ प्रचार जोरात

By admin | Updated: September 25, 2014 04:22 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उरलेले कमी दिवस आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यास लागणारा कालावधी पाहता अनेक राजकीय पक्षांनी जलद सेवा म्हणून हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांची निवड केली

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उरलेले कमी दिवस आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यास लागणारा कालावधी पाहता अनेक राजकीय पक्षांनी जलद सेवा म्हणून हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांची निवड केली आहे. हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांसाठी प्रत्येक तासाला लाखो रुपये भाडे कंपन्यांकडून आकारण्यात येत असले तरी ते देण्याची तयारी राजकीय पक्षांनी दाखविली आहे. सध्या महाराष्ट्रात प्रचारासाठी ४0 पेक्षा अधिक हेलिकॉप्टर आणि छोटी विमाने कार्यरत झाली आहेत. राज्यभर १५ आॅक्टोबरला एकाच वेळी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. हे पाहता प्रचार करण्यासाठी फारच कमी कालावधी आहे. जागावाटपाचा घोळ आणि त्यातच पितृपक्षामुळे तिकिट वाटपच न झाल्याने उरलेल्या दिवसांत प्रचार करणे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना फारच अवघड जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी प्रचारासाठी पोहोचायचे कसे, असा प्रश्न असणाऱ्या नेत्यांनी यासाठी हॅलिकॉप्टर आणि छोट्या विमानांची निवड केली आहे. छोट्या अंतराच्या ठिकाणी पोहोचण्यासाटी हॅलिकॉप्टर तर लांबच्या अंतरासाठी विमाने नेत्यांकडून वापरण्यात येणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे हॅलिकॉप्टरचे प्रत्येक तासाला भाडे ७५ हजार ते १ लाख २५ हजार रुपये आणि विमानाचे भाडे हे प्रत्येक तासाला १ लाख ते दीड लाखपर्यंत आकारण्यात येत असले तरी राजकीय पक्षांनी या जलद सेवेसाठी पैसे देण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या ४0 पेक्षा अधिक हेलिकॉप्टर आणि विमाने कार्यरत झाल्याचे उड्डाण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जवळपास ३0 हेलिकॉप्टर आणि विमाने वापरण्यात आली होती.