शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरवर मध्यस्थी न करण्याचे धोरण १९५० मध्ये ठरले

By admin | Updated: August 29, 2015 00:46 IST

काश्मीर मुद्यात मध्यस्थी न करणे आणि आपसातील वाद चर्चेद्वारे मिटविण्याकरिता भारत व पाकिस्तानला प्रोत्साहित करण्याचे अमेरिकन धोरण १९५० च्या दशकात तयार झाले होते.

वॉशिंग्टन : काश्मीर मुद्यात मध्यस्थी न करणे आणि आपसातील वाद चर्चेद्वारे मिटविण्याकरिता भारत व पाकिस्तानला प्रोत्साहित करण्याचे अमेरिकन धोरण १९५० च्या दशकात तयार झाले होते. अमेरिकी गुप्तचर संघटना सीआयएने गेल्या जुलैत उघड केलेल्या गोपनीय अमेरिकन दस्तावेजातून ही बाब समोर आली. १९५४ च्या या अत्यंत गोपनीय दस्तावेजानुसार, केवळ भारत व पाकिस्तानच शांतता, तसेच चर्चेच्या माध्यमातून काश्मीर वाद सोडवू शकतात, या निष्कर्षावर अमेरिका पोहोचली. याचे प्रतिबिंब आॅपरेशन को-आॅर्डिनेशन बोर्डाच्या या दस्तावेजातील परिच्छेद क्रमांक ४२ मध्ये उमटलेले आहे. तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आईजनहावर यांनी १९५४ मध्ये या बोर्डाची स्थापना केली होती. राष्ट्रीय सुरक्षा धोरणांच्या (एनएसए) अंमलबजावणीसाठी सरकारच्या विविध संस्था आणि संघटनांत समन्वय राखण्याची जबाबदारी या बोर्डाची होती. दस्तावेजाच्या ४२ व्या परिच्छेदात म्हटले आहे की, भारताला हे स्पष्ट करण्यात येते की, भारत व पाकदरम्यानच्या परस्पर तडजोडीतूनच काश्मीर समस्येचे निराकरण होऊ शकते. अमेरिका संयुक्त राष्ट्र आणि इतर माध्यमांतून यासाठी मदत करण्यास तयार आहे. कोणत्याही एका देशाची बाजू घ्यावी, असा अमेरिकेचा कोणताही वैयक्तिक अथवा गुप्त हेतू नाही.