शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट प्रमाणपत्राचे धोरणअधिक मुक्त !

By admin | Updated: June 11, 2016 05:59 IST

चित्रपट प्रमाणपत्र देण्यासंबंधी नियम अधिक मुक्त करण्यासह काही आमूलाग्र बदलांची घोषणा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत चित्रपट प्रमाणपत्र देण्यासंबंधी नियम अधिक मुक्त करण्यासह काही आमूलाग्र बदलांची घोषणा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे.केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाने(सीबीएफसी) अर्थात सेन्सॉर बोर्डाने सध्या वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटातील ८९ दृश्यांना कात्री लावल्याच्या विरोधात निर्मात्यांनी चित्रपट प्रमाणपत्र अ‍ॅपिलेट लवादाकडे (एफसीएटी) दाद मागितली आहे.या चित्रपटाचे १७ जून रोजी प्रदर्शन ठरले असून त्याच दिवशी लवादाकडून सुनावणीची शक्यता आहे. उडता पंजाबच्या वादाबद्दल विचारण्यात आले असता जेटली म्हणाले की, मी हा चित्रपट बघितला नसल्यामुळे काहीही सांगू इच्छित नाही. वादाचे कारण ठरलेले हे प्रकरणही मला माहीत नाही. चित्रपट प्रमाणपत्र देण्यासंबंधी सध्याच्या पद्धतीबाबत मी समाधानी नाही. त्यात बदल केले जातील. श्याम बेनेगल यांनी त्यावर अभ्यासपूर्ण अहवाल दिला आहे. त्याचा पहिला भाग माझ्याकडे आला असून तो सरकारच्या विचाराधीन आहे. येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण बदलांबाबत घोषणा केली जाईल. (वृत्तसंस्था)>बेनेगल यांच्या समितीने सुचविले बदल...चित्रपट प्रमाणपत्रांसंबंधी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या श्याम बेनेगल यांच्या समितीने काही बदल सुचविले असून प्रमाणपत्र देण्याबाबत निश्चित अशी यंत्रणा आणली जाईल. त्यासाठी सेन्सॉरशीप नव्हे सर्टिफिकेशन हाच शब्द अचूक ठरतो. चित्रपट प्रमाणपत्र प्रदान करण्यासंबंधी नियम अधिक मुक्त केले जातील, असेही जेटलींनी येथे एका कार्यक्रमात स्पष्ट केले.