शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या ‘मन की बात’चा सुरतच्या मॉक ड्रिलमध्ये पर्दाफाश

By admin | Updated: January 1, 2015 03:04 IST

सुरतमधील पोलिसांनी बुधवारी दहशतवादविरोधी लढाईचे प्रात्यक्षिक मॉक ड्रिलच्या माध्यमातून सादर केले.

सुरत : सुरतमधील पोलिसांनी बुधवारी दहशतवादविरोधी लढाईचे प्रात्यक्षिक मॉक ड्रिलच्या माध्यमातून सादर केले. हे प्रात्यक्षिक सादर करताना दहशतवादी बनलेल्या युवकाला डोक्यावर फिट बसणारी खास प्रकारची टोपी देण्यात आली. ही टोपी एका समाजाची निदर्शक असल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले असून, यातून पोलिसांची मानसिकता उघड झाल्याचे बोलले जात आहे. दहशतवादीविरोधी लढाईसाठी पोलिसांची तयारी पाहण्यासाठी या कवायतींचे आयोजन करण्यात आले होते. सुरत ग्रामीण पोलिसांनी ही कवायत आयोजित केली होती. त्यासाठी एक पोलिस अधिकारी व दहशतवादी बनलेले दोन नागरिक नाट्यात सहभागी झाले होते. दहशतवादी बनलेल्या लोकांना खास डोक्याला बसणाऱ्या टोप्या देण्यात आल्या होत्या. या टोप्या मुस्लीम समाजाचे निदर्शक असल्याने वाद उफाळला. सुरत पोलिसांनी यासंदर्भात खेद व्यक्त करण्यास नकार दिला, पण हा वाद टाळता येण्यासारखा होता,हे मान्य केले. संबंधित पोलिस ठाण्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, प्रसारमाध्यमांनी या घटनेचा गवगवा करु नये असे सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या भागात राहणारे लोक असाच पोशाख करतात, त्यामुळे कोणत्याही समाजाचा उल्लेख करण्यासाठी पोशाखाची निवड केली नव्हती. पण राजकीय पक्षांनी हा मुद्दा लगेचच उचलला असून गुजरातमधील भाजपा सरकारवर शरसंधान सुरु झाले आहे. जदयूचे नेता अली अन्वर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. राज्यात अजूनही अशा घटना घडताना दिसतात. ही अत्यंत दुर्दैवी घटना होती. यामुळे लोकांची मानसिकता उघड झाली. दहशतवादाची सांगड कोणत्याही धर्माशी घालू नये. च्काँग्रेसचे रशिद अल्वी यासंदर्भात बोलताना म्हणाले, दहशतवाद कोणत्याही धर्माशी निगडीत नसतो, तसे दाखवणे गैर आहे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अशा घटनामुळेच दहशतवादाला बळ मिळते.