पोलिसाच्या मुलीने दिली दुचाकीला धडक
By admin | Updated: July 1, 2016 23:30 IST
जळगाव: ख्वॉजामिया चौकात दुचाकीचे वळण घेत असताना स्नेहा जगन्नाथ निंभोरे (वय १९,वाघनगर) या तरुणीला पोलीस कर्मचार्याच्या मुलीने जोरदार धडक दिली. त्यात स्नेहा जखमी झाली असून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजता हा अपघात झाला. पोलीस कर्मचार्याच्या मुलीजवळ विना क्रमांकाची दुचाकी होती व विशेष म्हणजे तिचे वडीलही सोबत होते. या अपघातात मदत करण्याऐवजी स्नेहावर दोन्ही बापलेकीनी दादागिरी केली असे स्नेहाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.