शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

एस.पी.कार्यालय आवारातच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांची तारांबळ : वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटू न दिल्याने घेतला निर्णय

By admin | Updated: October 22, 2016 22:23 IST

जळगाव: मारहाणीची तक्रार करूनही त्याची पोलीस स्टेशनला दखल घेण्यात आली नाही,तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांनाही भेटण्यास मज्जाव केल्याने संतप्त तरुणाने पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. राम तमायचेकर (रा.जाखनी नगर, जळगाव) असे तरुणाचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजता ही घटना घडली.

जळगाव: मारहाणीची तक्रार करूनही त्याची पोलीस स्टेशनला दखल घेण्यात आली नाही,तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांनाही भेटण्यास मज्जाव केल्याने संतप्त तरुणाने पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. राम तमायचेकर (रा.जाखनी नगर, जळगाव) असे तरुणाचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजता ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, राम तमायचेकर याला निर्मला बिरजू भाट, विशाल बिरजू भाट व विना बिरजू भाट या तिघांकडून दोन दिवसापासून मारहाण होत आहे. राम याची पत्नी मिना तमायचेकर यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रारही दिली. त्याची अदखलपात्र नोंद करण्यात आली. या तक्रारीनंतरही त्रास सुरुच आहे तर पोलिसांनी मारहाण करणार्‍यावर कुठलीच कारवाई केली नाही असा आरोप तमायचेकर पती-पत्नीने केला.
अन् संतापात चढला झाडावर
मारहाण करणार्‍यावर कारवाई होत नसल्याने राम हा पत्नी मिना व दोन मुलांसह संध्याकाळी साडे पाच वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात आले, मात्र त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. आम्हाला कोणत्याही वरिष्ठ अधिकार्‍याला भेटू द्या, अशी मागणी राम व त्याची पत्नीने केली,परंतु त्यांना आत जाण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे राम हा संतापात धावत जाऊन झाडावर चढला व सोबत आणलेली दोरी गळ्यात गुंडाळली, हा प्रकार लक्षात येताच त्याच्यासोबतच्या लोकांसह पोलिसांनी धाव घेत लटकण्याच्या आत त्याला झाडाच्या खाली ओढले.
उपअधीक्षकांसमोर केले हजर
या घटनेनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातून निरोप येताच जिल्हा पेठचे हेडकॉन्स्टेबल दिलीप पाटील, छगन तायडे यांनी घटनास्थळ गाठले. त्याला ताब्यात घेऊन वाहनात बसवत असतानाही त्याने गोंधळ घातला. त्यानंतर पती-पत्नीला नियंत्रण कक्षात नेण्यात आले. एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. बाहेर नेत असताना उपअधीक्षक सचिन सांगळे कार्यालयात दाखल झाले, त्यामुळे दोघांना त्यांच्यासमोर हजर करण्यात आले.
कोट..
तो तरुण नशेत होता, शिवाय पैशावरून त्यांचा खासगी वाद आहे. तसेच त्याच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत.तरीही संबंधित व्यक्तीच्याविरुध्द अदखलपात्र गुन्‘ाची नोंद करण्यात आली आहे. दिवाणी बाब असल्याने त्याची समजूत घालण्यात आली.
-सचिन सांगळे, पोलीस उपअधीक्षक