शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षक, वकिलासह तिघांचा इनकॅमेरा जबाब सादरे आत्महत्या प्रकरण : जळगावातील अन्य दोघांनाही नोटिसा

By admin | Updated: January 31, 2016 00:16 IST

जळगाव: रामानंद नगरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी रामानंदचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, सादरे यांचे वकील विजय दाणेज व बुलढाण्याचे सहायक उपनिबंधक निलेश साबळे आदींचा गुरुवारी नाशिक न्यायालयात इनकॅमेरा जबाब नोंदविण्यात आला. या जबाबासाठी जळगावात आणखी दोनजणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र ते दोघंही गैरहजर राहिले.

जळगाव: रामानंद नगरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी रामानंदचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, सादरे यांचे वकील विजय दाणेज व बुलढाण्याचे सहायक उपनिबंधक निलेश साबळे आदींचा गुरुवारी नाशिक न्यायालयात इनकॅमेरा जबाब नोंदविण्यात आला. या जबाबासाठी जळगावात आणखी दोनजणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र ते दोघंही गैरहजर राहिले.
सादरे आत्महत्या प्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू व्यावसायिक सागर चौधरी यांच्यावर पंचवटी पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. सध्या हा तपास सीआयडीकडे आहे. मध्यंतरी सीआयडीचे अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची कोल्हापुरला बदली झाल्यानंतर हे प्रकरण काही अंशी शांत झाले होते. नवीन अधीक्षकपदी रमेश गायकवाड २५ जानेवारीला रुजू झाल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा गती देण्यात आली.
जळगावात चारजणांना नोटिसा
या चौकशीचा एक भाग म्हणून सीआयडीने जळगावमधील पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, सादरे यांचे वकील विजय दाणेज, पत्रकार आनंद शर्मा व अन्य एका जणाला नोटीस बजावून २८ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. या चौघांसह सादरे यांचे मित्र तत्कालीन उपनिरीक्षक व बुलढाण्याचे विद्यमान सहायक उपनिबंधक नीलेश साबळे यांनाही नोटीस बजावण्यात आली होती.
कलम १६४ अन्वये नोंदविला जबाब
पाटील, ॲड.दाणेज व साबळे यांचा न्या.किशोर वसावे यांच्या न्यायालयात कलम १६४ अन्वये इनकॅमेरा जबाब नोंदविण्यात आला. दाणेज यांचा तब्बल दोन तास तर पाटील यांचा अर्धा तास जबाब सुरु होता. साबळे यांचाही जवळपास २० मिनिटे जबाब नोंदविण्यात आला. सीआयडीचे उपअधीक्षक तथा तपासाधिकारी के.डी.पाटील व अन्य दोन अधिकार्‍यांनी तिघांना सकाळी अकरा वाजता न्यायालयात नेले होते. तीन वाजेनंतर प्रत्यक्ष जबाबाला सुुरुवात झाली.