वडाळागाव : गेल्या दोन महिन्यांपासून वडाळागाव परिसरात भुरट्या चोरांनी हैदोस घातला असून, घरफोड्यांचे सत्र वाढीस लागल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मध्यरात्रीनंतर पोलिसांची गस्त थंडावत असल्याने घरे, दुकानांवर चोरटे हात साफ करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दसर्यापासून भुरटे चोर वडाळागावामध्ये अधिक सक्रिय झाले असून दुचाकी चोरणे, पेट्रोल, बॅटर्या, वाहनांचे भाग लंपास करणार्या चोरांची मजल थेट घरे, दुकाने फोडण्यापर्यंत पोहचल्याने पोलिसांचा परिसरात वचक नसल्याचे उघडपणे बोलले जात असून, पोलीस गस्तीविषयी उलटसुलट चर्चा होत आहे.
वडाळ्यात मध्यरात्री हवी पोलीस गस्त
By admin | Updated: May 11, 2014 00:09 IST