शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त

By admin | Updated: August 19, 2015 01:44 IST

पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांच्या पर्वती येथील निवासस्थानासमोर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त आज सायंकाळनंतर ठेवण्यात आला. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण दिले जाऊ नये या मागणीसाठी राज्यात आज काही ठिकाणी हिंसक प्रकार झाले. स्वत: पुरंदरे मुंबईस रवाना झाले आहेत. मात्र हिंसक घटनांचे पडसाद त्यांच्या निवासस्थानावर उमटू नयेत यासाठी २० ...



पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांच्या पर्वती येथील निवासस्थानासमोर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त आज सायंकाळनंतर ठेवण्यात आला.
पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण दिले जाऊ नये या मागणीसाठी राज्यात आज काही ठिकाणी हिंसक प्रकार झाले. स्वत: पुरंदरे मुंबईस रवाना झाले आहेत. मात्र हिंसक घटनांचे पडसाद त्यांच्या निवासस्थानावर उमटू नयेत यासाठी २० ते २५ पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
स्वारगेट पोलीस ठाण्याचे गुन्हे निरिक्षक राम राजमाने यांनी या माहितीस दुजोरा देऊन सांगितले की त्यांच्या घरावर पुर्वीही साध्या वेषातील पोलिसांचा बंदोबस्त होता, आज त्यात वाढ करण्यात आली आहे.
--------
फर्ग्युसन परिसरात घरफोडी
पुणे : फर्ग्युसन परिसरातील नामदार गोखले रस्त्यावरील एका सोसायटीतील फ्लॅटचे कुलुप तोडून चोरांनी दागिने व चांदीच्या वस्तु असा ८ ते १० लाख रुपये किंमतीचा ऐवज लांबविला. आज दुपारी ही घटना उघडकीस आली.
दिलीप विलास अरगडे (पुष्पाली अपार्टमेंट, परांजपे रस्ता, शिवाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद केली. ते चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. सोमवारी ते बाहेरगावी गेले होते. फ्लॅटचे कुलुप तोडून चोरांनी २० ते २५ तोळे दागिने, दीड किलो वजनाच्या चांदीच्या वस्तु असे एवज लंपास केला.
आज दुपारी अरगडे घरी परतल्यावर चोरीचा प्रकार त्यांना समजला. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. उच्चभ्रू भागात घरफोडी झाल्याने वैशाली हॉटेल परिसरात घबराट झाली.