शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

युवासेना महानगरप्रमुखाच्या रौलेट अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By admin | Updated: July 7, 2016 00:49 IST

महानगरप्रमुखासह १४ जण ताब्यात : रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

महानगरप्रमुखासह १४ जण ताब्यात : रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त नाशिक : शिवसेनेच्या युवासेना महानगरप्रमुखाच्या बंगल्यात सुरू असलेल्या रौलेट जुगार अड्ड्यावार पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी पोलीस अधिकार्‍यांसह बुधवारी (दि़ ६)रात्री अचानक छापा मारला़ या ठिकाणी रौलेट जुगार खेळणार्‍या १४ जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या युवासेनेचा महानगरप्रमुख रुपेश शिवाजी पालकर याचा तपोवनात बंगला आहे़ या बंगल्यात कित्येक महिन्यांपासून रौलेट जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती़ त्यानुसार बुधवारी सव्वानऊ वाजेच्या सुमारास पाटील यांनी सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर, म्हसरूळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह मोठा फौजफाटा घेऊन या जुगार अड्ड्यावर छापा टाकला़पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी सुमारे १४ जण रौलेट जुगार खेळत होते़ पोलिसांनी या चौदा जुगार्‍यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कमही हस्तगत केली आहे़ तसेच या बंगल्यावरील १४ संगणकांसह लाखो रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे़ दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)