शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनो ‘स्मार्ट’ बना!

By admin | Updated: December 1, 2014 00:09 IST

पोलिसांनी ‘स्मार्ट’ व्हायला हवे़ ज्या देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम आहे, त्या देशाला शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहावे लागत नाही, त्यामुळे,,,,

गुवाहाटी : पोलिसांनी ‘स्मार्ट’ व्हायला हवे़ ज्या देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम आहे, त्या देशाला शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहावे लागत नाही, त्यामुळेच ‘स्मार्ट’ होण्याची गरज आहे, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिसांना दिला़गुप्तचर विभागाद्वारे (आयबी) आयोजित पोलीस महासंचालकांच्या ४९ व्या वार्षिक परिषदेत पंतप्रधान रविवारी बोलत होते़ देशाची सुरक्षा ही तुमच्या शस्त्रागारात किती शस्त्रास्त्रे आहेत आणि किती लोक त्याचा वापर करतात, यावर नाही तर तुमची गुप्तचर यंत्रणा किती सक्षम आहे, यावर ती अवलंबून असते़ तेव्हा स्मार्ट बना, असे मी म्हणेन, असे मोदी म्हणाले़‘स्मार्ट (एसएमएआरटी) पोलिसिंग’ याचा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थही मोदींनी सांगितला़ ते म्हणाले, एसएमएआरटी यातील ‘एस’ म्हणजे (स्ट्रिक्ट) कठोर; पण संवेदनशील बना़ एम म्हणजे (मॉडर्न) आधुनिक; पण गतिमान राहा़ ए म्हणजे (अलर्ट) सतर्क; पण उत्तरदायी बना़ आर म्हणजे (रिलायबल) जनतेचा तुमच्यावर विश्वास असू द्या; पण सोबतच तुम्हीही जनतेचा विश्वास संपादन करा आणि टी म्हणजे (टेक्नोसॅव्ही) तंत्रज्ञानाचा जाणकार असा; पण हा वापर दक्ष राहून करा़३३ हजार पोलीस शहीदस्वातंत्र्यानंतर देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या ३३ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना गौरवान्वित करण्यावर त्यांनी भर दिला़ पोलीस कर्मचाऱ्याचे आयुष्य कायम तणावपूर्ण आणि असुरक्षित असते़ अशास्थितीत प्रत्येक पोलिसाच्या कुटुंबाची सुरक्षा, त्यांचे स्थैर्य याची जबाबदारी घेणे सरकारचे काम आहे़, असे मोदी म्हणाले. सिन्हांच्या डुलक्या सुरूचपंतप्रधान नरेंद्र मोदी येथे पोलीस महासंचालकांच्या वार्षिक परिषदेत पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत बोलत असताना सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा डुलक्या घेत होते. शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या भाषणाच्या वेळीही ते अशाच डुलक्या घेताना आढळल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. (वृत्तसंस्था)