शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तावरील पोलीस शहराबाबत अनभिज्ञ

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

भाविकांची दिशाभूल : पायपीटमध्ये झाली वाढ

भाविकांची दिशाभूल : पायपीटमध्ये झाली वाढ
नाशिक : सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी संपूर्ण राज्यभरातून सुमारे बारा हजार पोलीस मागविले खरे; परंतु त्यांच्याबरोबर शहराची माहिती असलेले स्थानिक पोलीस न दिल्याने भाविकांना चुकीची माहिती दिली गेली़ एकाच जागेवर फिरून येणार्‍या या भाविकांच्या पायपिटीत भर पडल्याने त्यांनी पोलीस यंत्रणेला अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली़
पर्वणीसाठी कोट्यवधी भाविक शहरात दाखल होतील, असे गृहीत धरून पोलीस यंत्रणेने संपूर्ण शहरात एकप्रकारे संचारबंदीच लागू केली होती़ त्यातच इतक्या मोठ्या संख्येने शहरात येणार्‍या भाविकांच्या नियंत्रणासाठी राज्यभरातून पोलीस कर्मचारीही मागविण्यात आले़ त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही प्रशिक्षणार्थी पोलिसांची असून, त्यांचा सेक्टरनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ मात्र या रिक्रूटला नाशिक शहराची पूरेपूर माहिती नसल्याचा प्रत्यय भाविकांना आला़
साधू-महंतांच्या स्नानानंतर भाविकांना टप्प्याटप्प्याने निर्धारित केलेल्या मार्गावरील घाटांवर स्नानासाठी सोडले जात होते़ स्नान आटोपून या भाविकांना आपापल्या ठिकाणी परतता यावे यासाठीदेखील मार्ग निर्धारित करण्यात आले होते़ गोदाघाटावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी हे शहरातील विविध मार्गांबाबत अनभिज्ञ असल्याने व त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस कर्मचारी नसल्याने भाविकांची मोठी दिशाभूल झाली़ काही भाविक तर फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येत असल्याने संतप्त होऊन हमरी-तुमरीच्या घटनाही घडल्या़
रविवार कारंजावरील गणपती मंदिरासमोर ड्यूटीवर असलेल्या पोलीस अधिकार्‍याला वृद्ध व्यक्ती अद्वतद्वा बोलत होती़ कारण या वृद्धांना दाखविलेल्या मार्गावरून तीनवेळा फिरूनही पुन्हा त्याच ठिकाणी येत असल्याने त्यांचा संताप झाला होता़ तर दुसर्‍या घटनेत साधुग्राममध्ये बारा बटालिया खालशात बिहार येथील पंकज प्रसाद गुप्ता हे मुक्कामी होते़ वृद्ध आई-वडील, पत्नी व छोट्या मुलीसह त्यांनी रामकंुडावर स्नान केले़
स्नान आटोपल्यानंतर साधुग्राममध्ये परतण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे जाण्याचा मार्ग विचारला असता त्यांनी डोंगरे वसतिगृहाकडे जाण्याचा मार्ग दाखविला़ यामुळे ते कुटुंबीयासह डोंगरे वसतिगृहावर गेले़ तेथून त्यांना परत रामघाटाकडे पाठविण्यात आले़ यामध्ये त्यांच्या माता-पित्यांसह त्यांच्या लहान मुलीला त्रास झाल्याने त्यांनी एकंदरीतच संपूर्ण पोलीस यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली़(प्रतिनिधी)

फोटो :- आर / फोटो / २९भाविक हाल फोटो या नावाने सेव्ह केला आहे़