शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची नक्षल्यांकडून हत्या

By admin | Updated: July 16, 2015 03:51 IST

छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित बीजापूर जिल्ह्णातून सोमवारी अपहरण करण्यात आलेल्या चार पोलीस जवानांचे बुधवारी अखेर गोळ्यांनी चाळणी झालेल्या अवस्थेतील मृतदेहच आढळून आले.

रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित बीजापूर जिल्ह्णातून सोमवारी अपहरण करण्यात आलेल्या चार पोलीस जवानांचे बुधवारी अखेर गोळ्यांनी चाळणी झालेल्या अवस्थेतील मृतदेहच आढळून आले. नक्षल्यांनी या चारही जवानांची क्रूर हत्या करून त्यांचे मृतदेह रस्त्यांवर फेकून दिले होते. मृतदेहांजवळ नक्षल्यांची काही पत्रके आढळली आहेत. पोलिसांकडून गरीब व उपेक्षित आदिवासींचा छळ होत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. या दरम्यान अन्य दोन अपहृत जवान अद्यापही नक्षल्यांच्या तावडीत असून त्यांचा शोध सुरूआहे.बीजापूर जिल्ह्णाचे पोलीस अधीक्षक के.एल. धु्रव यांनी ही माहिती दिली. जिल्ह्णाच्या कुटरू ठाण्याअंतर्गत गुदमा गावानजीकच्या रस्त्यावर या चारही पोलीस जवानांचे मृतदेह सापडले. सहायक आरक्षक राजूराम केलम, मंगल सोढी, जयदेव यादव आणि रामा भज्जी अशी मृत्युमुखी पडलेल्या जवानांची नावे आहेत. गत सोमवारी बीजापूरवरून कुटरूला परतत असताना कुटरू-सकनापल्लीदरम्यान नक्षल्यांनी या पोलिसांची बस रोखत तिची झडती घेतली होती. यानंतर बसमधील चार पोलिसांना खाली उतरवून नक्षली आपल्यासोबत घेऊन गेले होते. धु्रव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पोलीस जवान काही खासगी कामासाठी बीजापूरला गेले होते व तेथून कुटरूकडे परत निघाले होते. यावेळी ते पोशाखात नव्हते. यापाठोपाठ दोन अन्य पोलीस जवान मोटरसायकलवरून कुटरूकडे येत असताना नक्षल्यांनी त्यांचेही अपहरण केले होते. मिच्चा हुंगा आणि जयलाल अशी या दोघांची नावे आहेत. त्यांचा अद्यापही शोध सुरू आहे. हे सर्व जवान अधिकाऱ्यांना माहिती न देता गेले होते शिवाय त्यांनी पुरेशी सुरक्षाही घेतली नव्हती, असा दावाही अतिरिक्त पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण एलेसेला यांनी केला.