शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2016 22:55 IST

जळगाव: दुचाकीवर तीन जण व त्यातही मद्याच्या नशेत तर्रर्र असताना वाहतुक पोलिसांशी हुज्जत घालणे तीन तरुणांना चांगलेच महागात पडले. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत एकाची कोठडीत रवानगी केली. त्यांच्या समर्थनार्थ आलेल्या एका वकीलानेही पोलीस निरीक्षकांशी वाद घातला.त्यामुळे शनिवारी दिवसभर हा विषय चर्चेचा ठरला.

जळगाव: दुचाकीवर तीन जण व त्यातही मद्याच्या नशेत तर्रर्र असताना वाहतुक पोलिसांशी हुज्जत घालणे तीन तरुणांना चांगलेच महागात पडले. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत एकाची कोठडीत रवानगी केली. त्यांच्या समर्थनार्थ आलेल्या एका वकीलानेही पोलीस निरीक्षकांशी वाद घातला.त्यामुळे शनिवारी दिवसभर हा विषय चर्चेचा ठरला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वाहतुक शाखेचे चार कर्मचारी शुक्रवारी संध्याकाळी साडे सात वाजता पारीख पार्क उद्यानाजवळ वाहनांची तपासणी करीत असताना एका दुचाकीवर तीन तरुण आले. या कर्मचार्‍यांनी त्यांना थांबवले. त्यातील एकाने मी ३९२ चा आरोपी आहे, तुम्ही माझे काय करुन घेणार असे म्हणत हुज्जत घातली. यातील दोघं जण मद्याच्या नशेत होते. त्यांच्या ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची केस करण्यात आली. या वादामुळे तिघांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणण्यात आले. ३९२ चा आरोपी म्हणणार्‍याचे रेकॉर्ड तपासले असता खरोखर त्याच्यावर रामानंद नगर पोलीस स्टेशनला ३९२ चा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
वकील-निरीक्षकात वाद
एका राजकीय पक्षाचे काम करणार्‍या वकीलाने पोलीस स्टेशन गाठून या तरुणांना सोडून द्यावे यासाठी पोलीस निरीक्षक कुबेर चवरे यांना विनंती केली, मात्र त्यांनी त्यास नकार दिला. तुम्ही वकील आहात तर न्यायालयातूनच त्यांना सोडा असे चवरे यांनी सुनावल्याने त्यावरुन दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर तिघांना न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, यातील एका तरुणाने पोलीस स्टेशनला येवून माझ्या मुलावर अन्यायकारक कारवाई करण्यात आली, यापूर्वीही त्याच्यावर असाच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला.