त्रिची : केवळ एका केळीसाठी पोलिसांमध्ये एकमेकांना गंभीर जखमी करेपर्यंत हाणामारी होऊ शकते यावर कुणी विश्वास ठेवणार नाही; पण बुधवारी रात्री शहरात हा लज्जास्पद प्रकार घडला. उपनिरीक्षक राधा व वाहनचालक सर्वनन हे रात्री गस्तीवर निघाले होते. सर्वनन याने सकाळच्या न्याहारीसाठी केळी आणली होती; परंतु केळी ठेवल्या जागेवर न दिसल्याने त्याने राधा यांना याबाबत विचारणा केली. तेव्हा आपण ती केळी खाल्ल्याचे राधा यांनी सांगितले. त्यानंतर सर्वननचा संताप अनावर झाला. त्याने राधा यांना शिवीगाळ सुरूकेली. बघताबघता ही बाचाबाची हाणामारीपर्यंत आली. दोघांच्याही नाकातोंडातून रक्त वाहू लागले. या दोघांनाही श्रीरंगम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौकशी सुरू आहे. (वृत्तसंस्था)
एका केळीसाठी पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
By admin | Updated: March 12, 2016 03:06 IST