शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

तोतया पोलीस गजाआड

By admin | Updated: February 10, 2015 00:55 IST

कारवाईचा धाक : पाच हजार उकळले

कारवाईचा धाक : पाच हजार उकळले
नागपूर : एकांतात गप्पा करीत बसलेल्या तरुण-तरुणीला कारवाईचा धाक दाखवून तोतया पोलिसाने पाच हजार रुपये उकळले. ईसासनी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. दरम्यान, तक्रार मिळताच एमआयडीसी पोलिसांनी धावपळ करून आरोपी तोतया पोलिसाला गजाआड केले. अवधेश सूरज पांडे (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. तो अजनीतील भगवाननगरात (कुकडे लेआऊट) राहातो.
विशाल मुरलीधर सागरकर (वय २१, मधुबन कॉलनी, हिंगणा) आणि त्याची मैत्रीण ईसासनी परिसरात शनिवारी सकाळी गप्पा करीत बसले होते. आरोपी पांडे तेथे आला. त्याने आपण पोलीस आहो, असे सांगून बनावट ओळखपत्रही दाखवले. विशाल तसेच त्याच्या मैत्रिणीला दमदाटी करून तुमच्यावर कारवाई करतो आणि दोघांच्या घरी कळवितो,अशी धमकी दिली. घाबरलेल्या विशालने त्याला विनवण्या केल्या. त्यामुळे कारवाई टाळायची असेल तर पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. कारवाई आणि बदनामीच्या धाकामुळे विशालने आरोपी पांडेला पाच हजार रुपये दिले.
दरम्यान, नंतर तो पुन्हा पैशाची मागणी करू लागला. त्यामुळे विशालला संशय आला. त्याने एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रविवारी रात्री पांडेला अटक केली. त्याचा आज कोर्टातून एक दिवसाचा पीसीआर मिळवला. या बनवेगिरीत त्याचे आणखी कुणी साथीदार आहेत काय आणि त्याने अशाच प्रकारे आणखी काही गुन्हे केले काय, त्याचा तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
-----