तोतया पोलीस गजाआड
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
तोतया पोलीस गजाआड
तोतया पोलीस गजाआड
तोतया पोलीस गजाआडनागपूर : पोलीस असल्याचे सांगून मावसभावासोबत मेयो हॉस्पिटलकडे जाणाऱ्या इसमाच्या खिशात हात टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीविरुद्ध तहसिल पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. राजेंद्र जयसिंग जरेया (३२) रा. धु्रव ग्राम ता. बेहर जि. बालाघाट हे हंसापुरी येथे राहणाऱ्या आपला मावसभाऊ वसंत भलावीकडे आले होते. मावसभाऊ आणि ते दोघे गुरुवारी दुपारी १.३० वाजता यशवंत स्टेडियमकडून मेयो रुग्णालय रोडकडे जात होते. मेयो हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर आरोपी शाहीद रजा वल्द गुलाम रजा (२४) रा. बेलेनगर, कळमना याने या दोघांना थांबविले. मी पोलीस आहे, तुझ्या खिशात काय आहे याची विचारणा करून जबरदस्तीने खिशातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी राजेंद्र जरेया यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसिल पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.