शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

तमिळनाडूच्या राजकारणात ‘पीएमके’चा भाव वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 06:19 IST

लढती होणार दुरंगी; कमल हासन यांच्याकडे आता सर्वांचे लक्ष, १५ पेक्षा जास्त जागांवर वणीयार समाजाचा प्रभाव

मिळनाडूमध्ये लोकसभेसाठी दुरंगी लढतीचे चिन्ह स्पष्ट झाले आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा पक्ष निवडणुकांत उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे आणि कमल हासन यांची भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी अण्णाद्रमुक, पीएमके, भाजपा अशी युती आणि विरोधात द्रमुक, काँग्रेस, एमडीएमके, डावे पक्ष व इतर असा सामना रंगणार आहे.

दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्ष विस्कळीत झाल्यामुळे द्रमुक आघाडी एकतर्फी निवडणूक जिंकेल, असे वातावरण होते. पण गेल्या दोन महिन्यांत अण्णा द्रमुक, पीएमके, भाजपा यांनी सामंजस्य ठेवून युती केली. तामिळनाडूतील जागावाटपाचे चित्र पाहिल्यास राष्ट्रीय पक्षांपेक्षा एस. रामदास यांच्या पीएमके पक्षाचा भाव वधारल्याचे चित्र दिसते. द्रविडीयन राजकारणाला विरोध करणाऱ्या पीएमकेने एनडीएच्या युतीतील सात मतदारसंघ मिळवल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एस. रामदास यांच्या पीएमके पक्षाची २०१४ मध्येही भाजपासोबत युती होती. त्यावेळी स्थानिक राजकीय घडामोडींचा फायदा भाजपा, पीएमके यांना झाला. या दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. तामिळनाडूतील वणीयार समाजाच्या मतांवर प्रभाव असणाऱ्या पीएमकेचा फायदा एनडीए आघाडीला होण्याची संधी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पीएमकेला ४.४४ टक्के मते मिळाली होती, तर २०१६च्या विधानसभा निवडणुकीत सहा टक्के मते मिळवली. त्या पक्षाला एकाही विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला नाही, पण राज्यात पीएमकेचे ७५ उमेदवार दुसºया क्रमांकावर होते. केडरबेस्ड आणि वणीयार समाजाची गठ्ठा मते यामुळे धर्मपुरी, चिदंबरम, अर्कोणम, कुड्डलूर या भागांत पीएमकेची बाजू भक्कम मानली जाते. मागासवर्गीयांत येणारा वणीयार समाज हा शेतीप्रधान मानला जातो.तामिळी राजकारणात सध्या पीएमकेचे प्रस्थ वाढत असून, राज्यातील एकूण ३९ जागांपैकी १५ पेक्षा जास्त जागांवर वणीयार समाजाचा मोठा प्रभाव आहे. उत्तर आणि पश्चिमी तामिळनाडूच्या पट्ट्यात पीएमके-अण्णाद्रमुक ही युती विजयाचे समीकरण यशस्वी ठरू शकते. पीएमकेने एनडीएशी हातमिळवणी केली नसती तर द्रमुकने या पट्ट्यात एकतर्फी आघाडी घेतली असती. पण त्याला आता या नव्या समीकरणामुळे खो बसणार आहे.

तामिळनाडूतील सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला पक्ष निवडणुका लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. मात्र ते निवडणुकीच्या तोंडावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी काहीच भूमिका न घेतल्यास त्यांचे समर्थक अर्थातच नाराज होतील. पण त्यांचा पक्ष रिंगणात उतरणार नसल्याचा फायदा आपणास होईल, असे भाजपा नेते सांगू लागले आहेत. रजनीकांत यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा वा समझोता करावा, यासाठी त्यांनी मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न भाजपा नेत्यांनी केला होता. त्यात यश आले नाही. पण रजनीकांत नसल्याने त्यांच्या अनुयायांची मते आपणास मिळतील, असे भाजपाला वाटत आहे.दुसरीकडे आणखी एक सुपरस्टार कमल हासन यांनी मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. तुमचा पक्ष भाजपाची बी टीम आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला, तेव्हा ते खूपच भडकले. माझा पक्ष भाजपाची बी टीम नव्हे, तर तामिळनाडूच्या राजकारणातील ए टीम आहे, असे त्यांनी सोमवारी बोलून दाखवले.त्यामुळे ते कोणाशीच समझोता न करता निवडणुका लढवणार, असे चित्र आहे. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची घेतलेली भेट आणि त्यांची भाजपाविरोधी भूमिका याचा फायदा द्रमुक-काँग्रेस आघाडीला होईल, अशी आतापर्यंतची चर्चा होती. पण त्यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला, तर त्याचा फायदा कोणाला होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.विधानसभेत फटका बसू नये म्हणून पीएमके सावधकेंद्रातील मोदी सरकार व राज्यातील अण्णा द्रमुक सरकार यांच्याविरोधात तामिळी जनतेत असंतोषाचे वातावरण दिसत आहे. या वातावरणाचा अंदाज घेत अंबुमणी रामदास यांनी आपली युती ही अण्णा द्रमुकशी असून, भाजपा त्या युतीचा एक घटक पक्ष असल्याचा प्रचार सुरू केला आहे. भाजपाच्या जवळीकीचा फटका बसू नये, याची काळजी पीएमके नेते घेताना दिसत आहेत. लोकसभेला भाजपाचा फायदा जरी झाला तरी विधानसभेला याचा आपल्याला फटका बसतो, याची प्रचिती पीएमके नेत्यांना २०१६च्या विधानसभा निवडणुकीत आली होती.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू